Urvashi Rautelaने दिल्या करवाचौथच्या शुभेच्छा; नेटिझन्स म्हणाले, Rishabh Pant ला सोड गं बाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 05:24 PM2022-10-12T17:24:53+5:302022-10-12T17:26:28+5:30

उर्वशीने तिच्या लेटेस्टपोस्टमध्ये चाहत्यांना करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यूजर्सनी अभिनेत्रीला रिषभ पंतवरुन ट्रोल करायला सुरुवात केली.

Urvashi Rautela wished fans happy karwa chauth in advance Rishabh Pant | Urvashi Rautelaने दिल्या करवाचौथच्या शुभेच्छा; नेटिझन्स म्हणाले, Rishabh Pant ला सोड गं बाई

Urvashi Rautelaने दिल्या करवाचौथच्या शुभेच्छा; नेटिझन्स म्हणाले, Rishabh Pant ला सोड गं बाई

googlenewsNext

Urvashi Rautela Latest Post: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) आणि भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्यातला ड्रामा काही केल्या संपण्याचं नाव घेत नाही. बॉलिवूड ब्यूटी उर्वशी रौतेला सध्या तिच्या ग्लॅमरस लुकमुळे नाही तर तिच्या पोस्टमुळे चर्चेत आहे. उर्वशीने तिच्या लेटेस्ट
पोस्टमध्ये चाहत्यांना करवा चौथच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या आहेत. यूजर्सनी अभिनेत्रीला रिषभ पंतवरुन ट्रोल करायला सुरुवात केली.

उर्वशी रौतेलाने पांढऱ्या टॉप, लाल स्कर्ट आणि मॅचिंग लाल हेअरबँडमध्ये पोझ देत फोटो शेअर केले आहे. कॅप्शनमध्ये उर्वशीने लिहिले - मला आशा आहे की, चंद्राचा प्रकाश तुमच्या जीवन आनंद, शांती, आनंद देईल. करवा चौथच्या आगाऊ शुभेच्छा... पण उर्वशी रौतेलाने करवा चौथच्या शुभेच्छा देऊन ट्रोलर्सला आमंत्रण दिलं आहे.  उर्वशीला नेटकरी रिषभच्या नावाने चिडवत आहेत.

नेटकरी उर्वशीने ही पोस्ट रिषभसाठी टाकल्याचा दावा करतायेत. एका युजरने लिहिते- करवा चौथचा व्रत ठेवणार का? युजरने उर्वशीला रिषभ पंतला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू दे अशी विनंती केली आहे. रिषभ पंतसाठी उर्वशी करवा चौथचं व्रत ठेवणार असल्याचेही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. उर्वशीच्या पोस्टवरील बहुतांश कमेंट्स रिषभशी संबंधित आहेत. उर्वशीला आता अशा कमेंट्सची सवय झाली असावी असे वाटते.


रिषभ आणि उर्वशीत नेमका काय वाद?
उर्वशी आणि पंत यांच्यातील वाद स्वतः उर्वशीने सुरू केला होता. एका मुलाखतीत उर्वशीने अप्रत्यक्षपणे ऋषभचे नाव घेत म्हटले होते की, 'एक क्रिकेटर हॉटेलच्या लॉबीमध्ये 10 तास माझी वाट पाहत होता.' उर्वशीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतनेही तिला टोमणे मारणारी एक इन्स्टा स्टोरी टाकली होती. रिषभ पंतने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये नाव न घेता लिहिले- 'ताई माझा पाठलाग करणे सोड.' मात्र, रिषभने इन्स्टा स्टोरी लगेचच डिलीट केली.

Web Title: Urvashi Rautela wished fans happy karwa chauth in advance Rishabh Pant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.