उर्वशी रौतेलाचा गाऊन ठरला इतरांसाठी डोकेदुखी, तब्बल 730 तासानंतर बनला हा गाऊन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 13:26 IST2020-02-19T13:22:32+5:302020-02-19T13:26:31+5:30
उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरचे तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अधिक चर्चेत असतात.

उर्वशी रौतेलाचा गाऊन ठरला इतरांसाठी डोकेदुखी, तब्बल 730 तासानंतर बनला हा गाऊन
फॅशन का है जमाना म्हणज सध्या कलाकार मंडळी त्यांच्या ड्रेसिंगमध्ये अनेक एक्सप्रिमेंट करताना दिसतात. पार्ट्या असो किंवा मग पुरस्कार सोहळे यात फक्त आणि फक्त आपल्याकडे सा-यांच्या नजरा असाव्यात याच अट्टाहासापोटी ना-ना शक्कल लढवत सेलिब्रेटी मंडळी स्टायलिश अंदाजात एंट्री मारतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते.
असंच काहीसं घडलं आहे उर्वशी रौतेलाबरोबरफिल्मफेअर अवॉर्डला उर्वशीने लाल रंगाच्या भल्या मोठ्या गाऊनमध्ये एंट्री मारताच सा-यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण यावेळी तिला हा गाऊन सावरण्यासाठी इतर लोकांचा आधार घ्यावा लागत होता.
इतकेच नाहीतर बसण्यासाठी तिला एक नाही तर चार चार खुर्च्या घेऊन बसावे लागले. याची लांबी एवढी होती की आजूबाजूच्या चार खुर्च्यावर कोणालाही बसता आले नाही. त्यामुळे कुठेतरी हा ड्रेस सावरताना होणारी धांदल तिच्या चेह-यावर दिसत होती. या गाऊनचे खास वैशिष्ट्य म्हणजे गाऊन तयार व्हायला तब्बल 730 तास लागले. अल्बीना डायलाने तिचा हा गाऊन खास पद्धतीने डिझाइन केला होता.
उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरचे तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अधिक चर्चेत असतात. सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर करण्याची एकही संधी ती सोडत नाही. इन्स्टाग्रामवर तिचे 2 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.