कोटा फुल है ना चिंटू चाचा...! युजरने केले ट्रोल, ऋषी कपूर यांनी असे दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 10:53 AM2020-03-25T10:53:30+5:302020-03-25T10:57:42+5:30
का भडकले चिंटू चाचा?
पीएम मोदींच्या निर्देशानंतर सर्व बॉलिवूड स्टार्सनी स्वत:ला घरात कैद करून घेतले आहे. आजपासून 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण भारतात संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. बॉलिवूडच्या सर्व स्टार्सनी याचे समर्थन केले आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हेही याला अपवाद नाही. ट्विटरवर कमालीचे अॅक्टिव्ह असलेल्या ऋषी कपूर यांनी आपल्या सर्व चाहत्यांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. पण याचदरम्यान एका सोशल मीडिया युजरने ऋषी कपूर यांना असा काही डिवचणारा प्रश्न विचारला की ऋषी कपूर भडकले आणि या डिवचणा-या युजरला त्यांनी सणसणीत उत्तर दिले.
One for all, all for one. Let us do what we have to do. We have no option. We will all keep one another busy and entertained for the coming time. No worries. No panic. Sala isko bhi dekh lenge. PM ji don’t worry we are with you! Jai Hind.
— Rishi Kapoor (@chintskap) March 24, 2020
आता हे सगळे काय प्रकरण आहे, युजरने असा काय प्रश्न केला की ऋषी कपूर इतके भडकले, ते जाणून घेऊ या... तर त्याचे झाले असे की, मोदींनी 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा करताच एका युजरने ऋषी कपूर यांनी ट्विट केले. ‘एकासाठी सगळे, सगळ्यांसाठी एक. आपल्याला तेच करायचे जे आपल्याला करायचेय. आपल्याकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नाही. आपण सगळे एकमेकांना बिझी ठेऊ. चिंतेचे कुठलेही कारण नाही. घाबरू नका. पीएमजी चिंता करू नका़ आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत,’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले.
Ye ek aur idiot https://t.co/795MGeCBZG
— Rishi Kapoor (@chintskap) March 24, 2020
त्यांचे हे ट्विट वाचून एका युजरने ऋषी कपूर यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ‘दारू का कोटा फुल है ना चिंटू चाचा,’ असा झोंबणारा सवाल या युजरने केला. युजरचा हा सवाल पाहून ऋषी कपूर यांचा पारा जाम चढला. मग काय, ‘ये एक और इडियट,’ असे या युजरला त्यांनी सुनावले.
These arseholes think it’s funny. Being deleted https://t.co/B8kpotuefG
— Rishi Kapoor (@chintskap) March 24, 2020
इतकेच नाही तर माझ्या देशाची वा माझ्या लाईफ स्टाईलची खिल्ली उडवणा-यांना मी डिलीट करेल. सावध राहा आणि हा इशारा समजा़ ही गंभीर स्थिती आहे, असेही त्यांनी सुनावले.