वरूण धवनवर साधला नेटीझन्सने निशाणा, म्हणाले ड्रगचीही टेस्ट करून घेतली असती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 15:49 IST2020-09-25T15:49:07+5:302020-09-25T15:49:39+5:30
बॉलिवूड सेलेब्स ड्रग्स पार्टी करत आहेत आणि सगळे नशेत आहेत. करण जोहरने लोकांचे हे आरोप फेटाळून लावत, असे म्हणणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करु असे म्हटले होते.

वरूण धवनवर साधला नेटीझन्सने निशाणा, म्हणाले ड्रगचीही टेस्ट करून घेतली असती
वरूण धवन नुकताच गर्लफ्रेंड नताशा दलालसह गोव्यामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसला होता. काही दिवसांपूर्वीच तो मुंबईत परतला आहे. व्हॅकेशनवरून येताच त्याने आपल्या कामाची सुरूवातही केली आहे.आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरूवात करण्याआधी वरूणने त्याची कोरोना चाचणी करून घेतली. यासंदर्भातला एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हिडीओ शेअर करत त्याने म्हटले की, कामाच्या सुरूवात करण्याआधी कोरोना चाचणी करून घेतली आहे. कोरोनाची लक्षणं नाही त्यामुळे सुरक्षित असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच इतरांनीही ''मास्क वापरा आणि सोशल डिस्टंसिंग''चे योग्य पालन करण्याचेही चाहत्यांना सांगितले आहे. शेअर केलेल्या व्हिडीओत तो कोरोना चाचणी करून घेत असल्याचे पाहायला मिळतेय.
तर दुसरीकडे नेटीझन्सने मात्र याच व्हिडीओवरून त्याला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, ''ड्रग टेस्टही करून घ्यायची होती''. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील ड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सारखे आणखी काही चेहरेही एनसीबीच्या रडारवर आहेत.
आतापर्यंत अभिनेत्रींचीच नावे समोर आली आहेत. ड्रग प्रकरणात अजून अभिनेत्यांची नाव समोर येणे बाकी आहे, त्यामुळे नेटीझन्सने वरूणवरही निशाणा साधत म्हटले की, ''पुढचे नाव तुझेही असू शकते''.
करण जोहर आयोजित ड्रग पार्टीत वरूण धवनही होता उपस्थित
2019मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या कथित ड्रग्स पार्टीचा व्हि़डीओ फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. एफएसएल आता व्हिडिओची पडताळणी करेल. या पार्टीत दीपिका पादुकोण, विकी कौशल, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन आणि रणबीर कपूरसह अनेक कलाकार दिसले होते. हा व्हिडिओ पाहून असं म्हटलं जात होतं की बॉलिवूड सेलेब्स ड्रग्स पार्टी करत आहेत आणि सगळे नशेत आहेत. करण जोहरने लोकांचे हे आरोप फेटाळून लावत, असे म्हणणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करु असे म्हटले होते.
वरून आगामी काळात सारा अली खानसह 'कुली नं १' रिमेकमध्ये झळकणार आहे. याच वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना संकटामुळे या सिनेमाची प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे.