'Gadar 2'ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचल्यानंतर 'गदर ३' येणार?, तारा सिंगच्या मुलाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 11:41 AM2023-10-18T11:41:26+5:302023-10-18T11:44:30+5:30

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २' या सिनेमात सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. 'गदर २'च्या यशानंतर 'गदर ३' येणार अशी चर्चा आहे.

Utkarsh sharma and simrat kaur spill beans about gadar 3 after gadar 2 success | 'Gadar 2'ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचल्यानंतर 'गदर ३' येणार?, तारा सिंगच्या मुलाने केला खुलासा

'Gadar 2'ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचल्यानंतर 'गदर ३' येणार?, तारा सिंगच्या मुलाने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा गदर २ हा सिनेमा सध्या  बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. तब्बल २२ वर्षानंतर रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा चर्चेत आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २' या सिनेमात सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. 'गदर २'च्या यशानंतर 'गदर ३' येणार अशी चर्चा आहे. 

यावर तारा सिंगच्या मुलगा जीतने खुलासा केला. त्याने 'गदर ३' ला घेऊन फॅन्सला अपडेट दिली आहे.  गदर २मधील जोडी उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर यांनी गरद ३ बाबत एका इंटरव्ह्यु दरम्यान खुलासा केला आहे. सिमरत म्हणाली, अनिल सर यावर सगळ्यात चांगलंच उत्तर देऊ शकतात.    

सिमरतनंतर उत्कर्ष म्हणाला, गदर ३ तेव्हाच बनेल जेव्हा चांगली स्क्रिप्ट आणि गोष्ट लिहिली जाईल. याच कारणामुळे 'गदर २'ला बनायला इतकी वर्ष लागली. जेव्हा योग्य कथा मिळाली तेव्हाच गदर २ बनला आणि गदर ३ चं तसेच आहे.  

गदर २ चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की 'गदर 3' मध्येही सेम स्टार कास्ट्स राहतील. आम्ही गदर-3, 'गदर' आणि 'गदर 2' च्या तुलनेत अधिक मोठ्या लेव्हलवर तयार करू. पहिल्या आणि दुसऱ्या पार्टप्रमाणेच तिसऱ्या पार्टमध्येही सनी देओलच असेल. तसेच, तिसऱ्या पार्टमध्ये आम्ही सनी देओलचा हँड पंप उखडतानाचा सीनही दाखवणार आहोत.'
 

Web Title: Utkarsh sharma and simrat kaur spill beans about gadar 3 after gadar 2 success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.