युवी-हेजलच्या संगीत-मेहंदी सोहळ्यात रंगांची उधळण!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2016 12:29 PM2016-11-30T12:29:38+5:302016-11-30T12:42:56+5:30

संगीत-मेहंदी सोहळा अतिशय जल्लोषात, हर्षाेल्हासात पार पडला. या सोहळ्यावेळी मान्यवर, क्रिकेटरमंडळी उपस्थित होती. कॉकटेल पार्टी कम संगीत सोहळ्याला विविध रंगांची उधळण करण्यात आली.

UV-Hijal Music-Mehndi festival color extraction! | युवी-हेजलच्या संगीत-मेहंदी सोहळ्यात रंगांची उधळण!

युवी-हेजलच्या संगीत-मेहंदी सोहळ्यात रंगांची उधळण!

googlenewsNext
्वत्र फुलांच्या माळा, रोषणाई, झगमगाट अशा वातावरणात काल चंदीगढमध्ये भारतीय क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल कीच यांचा संगीत आणि मेहंदी सोहळा संपन्न झाला. त्यांचा लग्नसोहळा अनुभवण्याची ओढ ‘बी टाऊन’ पासून ते सर्व क्रिकेटर्सना लागली आहे. युवी-हेजल कसे दिसत असतील? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना ते अतिशय साध्या वेशातील काळ्या रंगाचा चुडीदार-अचकन आणि पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस अशा क्यूट वेशात ते आले. संगीत-मेहंदी सोहळा अतिशय जल्लोषात, हर्षाेल्हासात पार पडला.  या सोहळ्यावेळी मान्यवर, क्रिकेटरमंडळी उपस्थित होती. कॉकटेल पार्टी कम संगीत सोहळ्याला विविध रंगांची उधळण करण्यात आली. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगढपासून ५० कि़मी.अंतरावरील फतेगड साहिब गुरूद्वारा येथे आज युवी-हेजल एकमेकांसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दिल्ली येथे लग्नाचे इतर विधी पूर्ण करण्यात येतील. युवी-हेजल लग्नाच्या दिवशी कुठली ड्रेसिंग करणार हा चाहत्यांमध्ये उत्सुकतेचा भाग बनलाय. डिझायनर जे.जे. वलया यांनी डिझाईन केलेले ड्रेसेस ते यावेळी घालतील. चंदीगढ येथे २ डिसेंबरला ग्रँड रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच गोव्यातही लग्नाचे रिसेप्शन पार पडणार असल्याचे कळतेय. 

युवराज सिंगचे लग्न आणि टीम इंडिया नसणार, असे कसे शक्य आहे? खरंतर टीम इंडियाने इंग्लंडसोबतची तिसरी टेस्ट मॅच संपवून ते लगेचच मित्र युवीच्या लग्नासाठी जमले आहेत. विराट कोहली, गौतम गंभीर, पार्थिव पटेल, अनिल कुंबळे आणि मोहम्मद कैफ हे सर्व क्रिकेटर्स चंदीगढ येथे लग्नसोहळ्यासाठी जमले आहेत. 
 


 

Web Title: UV-Hijal Music-Mehndi festival color extraction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.