Video: 'छावा'च्या म्युझिक लाँच सोहळ्यात मराठमोळी गायिका वैशाली सामंतने ए.आर.रहमानसोबत दिला धमाकेदार परफॉर्मन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 09:24 IST2025-02-13T09:23:45+5:302025-02-13T09:24:26+5:30
'छावा'च्या म्युझिक लाँच सोहळ्यात वैशाली सामंतने ए.आर.रहमान यांच्यासह 'छावा' सिनेमातील गाणी गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केलं (chhaava, vaishali samant, a r rahman)

Video: 'छावा'च्या म्युझिक लाँच सोहळ्यात मराठमोळी गायिका वैशाली सामंतने ए.आर.रहमानसोबत दिला धमाकेदार परफॉर्मन्स
'छावा' सिनेमाची (chhaava movie) उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्या (१४ फेब्रुवारी) हा सिनेमा जगभरात प्रदर्शित होणार आहे. संभाजी महाराजांची गाथा यानिमित्ताने सर्वदूर पोहोचणार आहे. 'छावा' सिनेमाच्या गाण्यांनी सुद्धा प्रेक्षकांचं मन जिंकलंय. 'जाने तू', 'आया रे तुफान' या गाण्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलंय. अशातच काल (१२ फेब्रुवारी) 'छावा'चा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. या म्युझिक लाँच सोहळ्यात दिग्गज संगीतकार ए.आर.रहमान (a r rahman) यांच्या साथीने वैशाली सामंतने (vaishali samant) खास परफॉर्मन्स दिला.
'छावा'च्या म्युझिक लाँच सोहळ्यात वैशाली-रहमान यांचा स्वरसाज
काल मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMAAC) मध्ये 'छावा' सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी कलाकार, तंत्रज्ञ आणि दिग्गज संगीतकार-गायक ए.आर.रहमान उपस्थित होते. यावेळी विशेष गोष्ट अशी घडली ती म्हणजे मराठमोळी गायिका वैशाली सामंतलाए. आर. रहमान यांच्यासोबत परफॉर्मन्स करायची संधी मिळाली. वैशालीने 'छावा'मधील 'आया रे तुफान' हे गाणं रहमान यांच्यासोबत गायलं. उपस्थित प्रेक्षकांनी या गाण्यांना चांगलीच दाद दिली. माझं स्वप्न पूर्ण झालं, अशा खास शब्दात वैशालीने तिच्या भावना व्यक्त केल्या.
'छावा' सिनेमाची उत्सुकता शिगेला
९ फेब्रुवारीपासून 'छावा' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. अवघ्या ७२ तासांमध्ये सिनेमाची तब्बल ३ लाख तिकिटे विकली गेली आहेत. भारतभरातील अनेक थिएटर्स 'छावा'च्या रिलीजच्या पहिल्याच दिवशी हाउसफुल्ल आहेत. त्यामुळे रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं राज्य असल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमधून आत्तापर्यंत ७.३ कोटींची कमाई केली आहे.