‘Valentine Week’ जाणार कोरडा... बॉक्सआॅफिसवर ‘रोमान्स सीझन’ला सुुट्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2017 11:25 AM2017-02-02T11:25:39+5:302017-02-02T17:02:53+5:30
सध्या बॉलिवूडमध्ये चलती आहे, ती रिअॅलिस्टिक चित्रपटांची. पण या रिअॅलिस्टिक सिनेमांनी बॉलिवूडमधील ‘रोमान्सच्या सीझन’ची सुुट्टी केलीयं. होय, यंदा ‘व्हॅलेन्टाईन ...
स ्या बॉलिवूडमध्ये चलती आहे, ती रिअॅलिस्टिक चित्रपटांची. पण या रिअॅलिस्टिक सिनेमांनी बॉलिवूडमधील ‘रोमान्सच्या सीझन’ची सुुट्टी केलीयं. होय, यंदा ‘व्हॅलेन्टाईन वीक’च्या मुहूर्तावर प्रदर्शित होणा-या चित्रपटांवर नजर टाकाल तर तुम्हालाही हे पटेल. या ‘व्हॅलेन्टाईन वीक’ला चित्रपटगृहांत प्रेमाची कळी फुलणार नाही तर अॅक्शन, ड्रामा अन् सन्पेन्स पाहायला मिळणार आहे. १० फेबु्रवारीला अक्षय कुमार याचा कोर्ट रूम ड्रामा ‘जॉली एलएलबी2’आपल्या भेटीस येणार आहे. यानंतर ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या आसपास म्हणजे १४ फेबु्रवारीच्या जवळपास दोन वेगवेगळे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटात प्रेम नाही तर प्रेम सोडून सगळे म्हणजे, अॅक्शन, ड्रामा, सन्पेन्स असा सगळा मसाला असणार आहे. म्हणजे फुल्ल टू कमर्शिअर मसाला असलेले चित्रपट. या चित्रपटांवर एक नजर....
जॉली एलएलबी2
‘जॉली एलएलबी’चा सीक्वल ‘जॉली एलएलबी2’ येत्या टेडी बीअर डेच्या दिवशी प्रदर्शित होतोय. या कोर्ट रूम ड्रामात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. अक्षय यात हुमा कुरेशीसोबत रोमान्स करताना दिसणार असला तरी मुळात हा कोर्ट रूम ड्रामा आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे रोमॅन्टिक मूडमध्ये असलेल्या तरूणाईचे काहीसे मूड आॅफ होणे अगदी ठरलेले आहे.
दी गाझी अटॅक
व्हॅलेन्टाईन डेची झिंग पूर्णपणे उतरायची बाकी असतानाच, ‘दी गाझी अटॅक’ हा चित्रपट रिलीज होतोय. व्हॅलेन्टाईन डेनंतर तीन दिवसांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तापसी पन्नू आणि राणा डग्गूबती यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट म्हणजे एक सागरी युद्धकथा आहे. अंशत: हा चित्रपट संकल्प रेड्डी यांच्या ‘ब्ल्यू फिश’ या पुस्तकावर आधारित आहे. भारतीय पाणबुडी एस21 वर तैनात जवानांचा १८ दिवसांचा पाण्यातील संघर्ष यात दिसणार आहे.तामिळ व तेलगूसह हिंदीत हा चित्रपट रिलीज होणार आहे. याच्या हिंदी व्हर्जनमध्ये महानायक अमिताभ यांचा आवाज आहे.
इरादा
‘इरादा’ हा चित्रपटही ‘दी गाझी अटॅक’सोबत सिनेमागृहांत झळकणार आहे. नसीरूद्दीन शहा आणि अर्शद वारसी यांची दमदार जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटात अर्शद पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत आहे. दिव्या दत्ता, शरद केळकर, सागरिका घाटगे यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
व्हाय नॉट ‘व्हॅलेन्टाईन वीक’ ?
यापूर्वी फेबु्रवारी महिन्यात बॉक्सआॅफिसवर केवळ प्रेम आणि प्रेम पाहायला मिळालचे. पण आताश: हा ट्रेंड पूर्णपणे मोडीत निघाला आहे. ईद, दिवाळी आणि नाताळप्रमाणेच ‘व्हॅलेन्टाईन वीक’ सुद्धा कमर्शिअल झालाय. यामागचे कारण शोधायचे झाल्यास गेल्या काही वर्षांतल्या या महिन्यात प्रदर्शित रोमॅन्टिक चित्रपटांवर एक नजर टाकावी लागेल. गतवर्षी ‘व्हॅलेन्टाईन वीक’दरम्यान सहा चित्रपट रिलीज झाले होते. यात ‘सनम रे’आणि ‘फितूर’ या दोन रोमॅन्टिक चित्रपटांचा समावेश होता. पण‘व्हॅलेन्टाईन वीक’ असूनही या दोन रोमॅन्टिक चित्रपटांकडे पे्रक्षकांनी पाठ फिरवली. याऊलट याच महिन्यात रिलीज झालेल्या ‘नीरजा’ व ‘अलीगढ’ या रिअल स्पेस चित्रपटांना लोकांनी पसंती दिली.