Bhediya Box Office Collection Day 4: मैं झुकेगा नहीं..., ‘दृश्यम 2’ला ‘भेडिया’ देतोय टक्कर, चार दिवसांत कमावले इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 10:44 AM2022-11-29T10:44:48+5:302022-11-29T10:45:18+5:30
Bhediya Box Office Collection Day 4: ‘दृश्यम 2’समोर ‘भेडिया’चा फार काही टिकाव लागणार नाही, असाच सर्वांचा समज होता. पण ‘भेडिया’ने हा समज खोटा ठरवत, ‘दृश्यम 2’ला जबरदस्त टक्कर दिली आहे.
Bhediya Box Office Collection Day 4: वरूण धवन (Varun Dhawan) व क्रिती सॅनन ( Kriti Sanon) स्टारर ‘भेडिया’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर शानदार कलेक्शन केलं आहे. अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’समोर ‘भेडिया’चा फार काही टिकाव लागणार नाही, असाच सर्वांचा समज होता. पण ‘भेडिया’ने हा समज खोटा ठरवत, ‘दृश्यम 2’ला (Drishyam 2) जबरदस्त टक्कर दिली आहे.
25 नोव्हेंबरला रिलीज झालेला ‘भेडिया’ हा सिनेमा ‘दृश्यम 2’समोर पराभव पत्करायला तयार नाही, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आत्तापर्यंत 32.40 कोटींचा गल्ला जमवला आहे.
#Bhediya should’ve performed better on the crucial Mon to cover lost ground… Needs to stay steady on remaining weekdays… Lack of major opposition [till #Avatar] can prove advantageous… Fri 7.48 cr, Sat 9.57 cr, Sun 11.50 cr, Mon 3.85 cr. Total: ₹ 32.40 cr. #India biz. pic.twitter.com/12UjbGyq8b
— taran adarsh (@taran_adarsh) November 29, 2022
रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 7.48 कोटींची कमाई केली. शनिवारी दुसऱ्या दिवशी 9.57 कोटींची कमाई केली. रविवारी या सिनेमाने 11.50 कोटींचा बिझनेस केला. काल सोमवारी या चित्रपटाने 3.85 कोटींचा बिझनेस केला.
जाणकारांच्या मते, ‘दृश्यम 2’चं तगडं आव्हान पुढे असताना ‘भेडिया’ने सोमवारी चांगली कमाई केली आहे. या आठवड्यात ही कमाईचा हाच वेग कायम राहिला तर या सिनेमाला मोठा फायदा होऊ शकतो. ‘भेडिया’चा बजेट 60 कोटी आहे. चारच दिवसांत यापैकी अर्धा बजेट चित्रपटाने वसूल केला आहे. या आठवड्यातील कमाईचे आकडे ‘भेडिया’ हिट होणार की फ्लॉप हे ठरवणार आहे.
‘भेडिया’ हा सिनेमा 2डी आणि 3 डीमध्ये रिलीज करण्यात आला आहे. हिंदीशिवाय तेलगू व तामिळ भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
अशी आहे कथा
लहान-सहान कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या भास्कर शमार्चीही कथा आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये जंगलातून रस्ता काढण्यासाठी गावकऱ्यांकडून जमिन अधिग्रहित करण्याचं कॉन्ट्रॅक्ट भास्करला मिळतं. त्यासाठी तो वडीलोपार्जित घरही गहाण टाकतो. चुलत भावासोबत हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचतो. एका वळणावर एक लांडगा भास्करच्या मागे लागतो. भास्कर झाडाला लटकतो, पण लांडगा त्याच्या पार्श्वभागाचा लचका तोडतो. उपचारांसाठी भास्करला जनावरांची डॉक्टर असलेल्या अनिकाकडे आणलं जातं. ती उपचार करते आणि दुसऱ्या दिवशी भास्करची जखम बरी होते. गावकऱ्याची मिटींग घेऊन भास्कर रस्त्याचं प्रपोजल त्यांच्यासमोर ठेवतो, पण गावकरी भडकतात. भास्कर तरुणांच्या लीडरशी हातमिळवणी करून त्यांच्या सह्या घेतो. त्यानंतर अशा काही घटना घडत जातात ज्या आकलना पलीकडल्या असतात...