‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावणार वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा! पाहा प्रोमो…
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 14:49 IST2023-11-20T14:46:55+5:302023-11-20T14:49:04+5:30
'कॉफी विथ करण 8' च्या पुढच्या भागात अभिनेता वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हजेरी लावणार आहेत.

‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावणार वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा! पाहा प्रोमो…
करण जोहरचा लोकप्रिय कार्यक्रम 'कॉफी विथ करण 8' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हजेरी लावणार आहेत. त्यामुळे 'कॉफी विथ करण 8' चा पाचवा एपिसोड आणखी मजेशीर असणार आहे.
वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा दोघेही आघाडीचे बॉलिवूड अभिनेते आहेत. या कार्यक्रमाच्या आगामी भागाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रोमोमध्ये वरुण आणि सिद्धार्थचा फॅशनेबल लूक पाहायला मिळत आहे. दोन्ही स्टार्स शोमध्ये करण जोहरसोबत मस्ती करताना आणि अनेक खुलासे करताना दिसत आहेत. प्रोमोमधील वरुण धवनचे एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो करण जोहरला होम ब्रेकर म्हणताना दिसत आहे.
याशिवाय करण जोहरने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये वरुण आणि सिद्धार्थ व्यतिरिक्त जान्हवी कपूर, विकी कौशल, काजोल आणि राणी मुखर्जी आणि अजय देवगण दिसत आहेत. 'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर आतापर्यंत दीपिका पादुकोण-रणवीर सिंह, सनी देओल-बॉबी देओल, सारा अली खान- अनन्या पांडे या जोड्यांनी हजेरी लावली आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक ‘कॉफी विथ करण’चे सगळे भाग पाहू शकतात.