Daddy On Duty! बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर दिसला वरुण धवन, लेकीचीही दिसली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 02:05 PM2024-06-07T14:05:02+5:302024-06-07T14:05:24+5:30

बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच वरुण धवन कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वरुण धवनची पत्नी नताशाला नुकताच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

varun dhawan carry his baby girl after discharge from hospital watch video | Daddy On Duty! बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर दिसला वरुण धवन, लेकीचीही दिसली झलक

Daddy On Duty! बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर दिसला वरुण धवन, लेकीचीही दिसली झलक

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन काही दिवसांपूर्वीच बाबा झाला. वरुणची पत्नी नताशाने सोमवारी(३ जून) गोंडस बाळाला जन्म दिला. वरुण आणि नताशाला कन्यारत्न प्राप्त झाल्याची माहिती अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती. आता बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच वरुण धवन कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

वरुण धवनची पत्नी नताशाला नुकताच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून घरी जाताना वरुण धवन आणि त्याच्या कुटुंबाला स्पॉट करण्यात आलं. यावेळी वरुण धवन डॅडीची ड्युटी करताना दिसला. लेकीला सांभाळत वरुण धवन हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसला. लेकीची आणि पत्नी नताशाची काळजी घेतानाही वरुण दिसत आहे. वरुण धवनचा हा व्हिडिओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. नुकत्याच बाबा झालेल्या वरुण धवनच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी अभिनंदन करण्याबरोबरच त्याचं कौतुकही केलं आहे. "घरी लक्ष्मी आली आहे. तिचं स्वागत करा", "अभिनंदन वरुण" अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

दरम्यान, नताशा आणि वरुण धवन यांनी २०२१मध्ये लग्नगाठ बांधली होती. २४ जानेवारी २०२१ रोजी त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. लग्नानंतर तीन वर्षांनी वरुण धवन आणि नताशाने आईबाबा होण्याचा निर्णय घेतला. नताशा-वरुण आईबाबा झाल्याचं कळताच चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

Web Title: varun dhawan carry his baby girl after discharge from hospital watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.