- अन् वरूण धवन सेटवरच कोसळला!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 10:09 AM2019-07-28T10:09:17+5:302019-07-28T10:10:24+5:30
अभिनेता वरूण धवन प्रत्येक भूमिकेसाठी किती मेहनत घेतो, हे नव्याने सांगायची गरज नाही. प्रत्येक सीनमध्ये जीव ओतण्यासाठी वरूण जीवाचे रान करतो. अर्थात त्याची हीच सवय कधीकधी त्याला महागात पडते.
अभिनेता वरूण धवन चित्रपटातील भूमिकांसाठी किती मेहनत घेतो, हे नव्याने सांगायची गरज नाही. प्रत्येक सीनमध्ये जीव ओतण्यासाठी वरूण जीवाचे रान करतो. अर्थात त्याची हीच सवय कधीकधी त्याला महागात पडते. होय, ‘स्ट्रिट डान्सर’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान असेच काही झाले आणि वरूण सेटवर चक्कर येऊन पडला.
होय, वरूणने सलग 18 तास या शूटींगमध्ये स्वत:ला झोकून दिले. खरे तर त्याच्या अंगात ताप होता. सर्दी होती. पण वरूण थांबला नाही. सहकलाकारांसोबत तो शूट करत राहिला. परिणामी दिग्दर्शकाने पॅकअप म्हणण्याआधी वरूण चक्कर येऊन सेटवर कोसळला. त्याचे ब्लड प्रेशर कमी झाल्याने त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरुणची तब्बेत ठीक नव्हती मात्र त्याने स्वत:हूनच डबल शिफ्ट करू करणार, असे दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना सांगितले. त्यानुसार, दुपारी 1 ते दुसºया दिवशी सकाळी 7 असे शेड्यूल आखण्यात आले. याच दिवशी वरुणला एका जाहीरातीचेही शूट पूर्ण करायचे होते. त्याने तेही केले. म्हणजे सलग 18 तास तो काम करत राहिला. वरूण सेटवर बेशुद्ध पडताच, सेटवर खळबळ माजली.
तूर्तास डॉक्टरांनी वरूणला विश्रांतीचा सल्ला दिला असून सिनेमाचे शूट थांबवण्यात आले. अर्थात दोन दिवस आराम करून वरूण पुन्हा सेटवर परतला, हे सांगणे नकोच.
वरुणने काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडीलांचा म्हणजे डेव्हिड धवन यांचा व्हिडिओ शेअर केला होता.
यामध्ये त्याचे बाबा त्यांची स्ट्रगल स्टोरी सांगताना दिसले होते. मी अनेकदा सकाळी 9 ते 5 आणि पुन्हा संध्याकाळी 8 ते सकाळी 4 अशी डबल ड्यूटी केली असल्याचे त्यांनी सांगितले होते. बाबांना ही डबल ड्यूटी झेपली. पण वरूणला ती झेपेलच असे नाही, हे आता तरी त्याला कळायला हवे. होय ना?