मालदीवमध्ये एन्जॉय करतोय वरुण धवन, स्विमिंग पूलमध्ये दिसला रिलॅक्स मूडमध्ये
By गीतांजली | Updated: October 17, 2020 15:09 IST2020-10-17T14:59:48+5:302020-10-17T15:09:08+5:30
कामाला सुरुवात करण्यापूर्वी अभिनेता वरुण धवन मालदीवमध्ये रिफ्रेश व्हायला गेला आहे.

मालदीवमध्ये एन्जॉय करतोय वरुण धवन, स्विमिंग पूलमध्ये दिसला रिलॅक्स मूडमध्ये
फिरायलं कुणाला नाही आवडत.. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात. विविध सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांचे पर्यटनस्थळांवरील फोटो शेअर करत असतात. त्यातही कोरोनामुळे सारेच घरात बंदिस्त झाले होते. हळुहळु सर्वच पूर्वपदावर येत आहे.
कामाला सुरुवात करण्यापूर्वी अभिनेता वरुण धवन मालदीवमध्ये रिफ्रेश व्हायला गेला आहे. सोशल मीडियावर वरुणने त्याचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये वरुण धवनने स्विमिंग पूलमध्ये रिलॅक्स अंदाजात दिसतोय. ''पाणीसारख्या बना जो अडळ्यातून ही आपला मार्ग तयार करतो- Bruce lee.''
मालदीवमध्ये रिफ्रेश होताना वरुण धवन
सोशल मीडियावर वरुण धवनची ही पोस्ट त्याच्या फॅन्सना खूप आवडली आहे. फोटो वरुणने ऑरेंज रंगाची शॉर्ट्स आणि ब्ल्यू गॉगल घातले आहे.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर वरुण धवन आगामी सिनेमा 'कुली नं 1' ला घेऊन चर्चेत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सारा अली खान दिसणार आहे. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या डेव्हिड धवनच्या ‘कुली नं.१’ चा कॉमेडी रिमेक आहे. जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तर नव्या चित्रपटात वरूण धवन आणि सारा अली खान हे दोन कलाकार दिसतील. तसेच विनोदी कलाकार परेश रावळ, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे देखील दिसणार आहेत. इतके वर्ष ओलांडली असली तरीही कुली नंबर - सिनेमाची जादू कमी झालेली नाही. त्यामुळे आता सिनेमाचा सिक्वेल बनत असल्यामुळे तीच लोकप्रियता या सिक्वलला मिळेल का हे पाहणे रंजक ठरणार आहे.