वरुण धवनला गर्लफ्रेंड नताशासोबत करायचे लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 10:14 AM2018-08-30T10:14:18+5:302018-08-30T10:27:36+5:30
बॉलिवूड स्टार वरुण धवन गर्लफ्रेंड नताशासोबतच्या नात्याला एका पाऊल पुढे घेऊन जायचे आहे. वरुणला नताशासोबत लग्न करायचे आहे.
बॉलिवूड स्टार वरुण धवन गर्लफ्रेंड नताशासोबतच्या नात्याला एका पाऊल पुढे घेऊन जायचे आहे. वरुणला नताशासोबत लग्न करायचे आहे. वरुणच्या कुटुंबीयांचा देखील नताशा आणि त्याच्या लग्नाचा पाठिंबा आहे. वरुणने अजून कधी अधिकृतपणे आपलं नातं स्वीकारले नव्हते मात्र त्याने लग्न करण्याची इच्छा जाहिरपणे बोलवून दाखवली आहे.
फिल्मफेयरला दिलेल्या इंटरव्हु दरम्यान वरुण म्हणाला की, माझं पहिलं प्रेम सिनेमा आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे आणि त्यानंतर नताशा, माझे कुटुंबीय आणि मित्रपरिवार येतो. लग्नाबाबत जेव्हा वरुणला विचारण्यात आले तेव्हा त्याचे उत्तर होते लग्न तर करायचे आहे मात्र कधी ते अजून ठरले नाही. आम्ही दोघं एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो त्यामुळे आमचं नातं खूप मजूबत आहे. आमचं नातं आणखीन एक कारणासाठी देखील खास आहे त्याच्या मागचे कारण म्हणजे मी अभिनता म्हणून तिला आवडतो. वरुणने आपल्या सिनेमांचे क्रेडिट नताशाला दिले आहे. नताशामुळे त्यांने 'बदलापुर' आणि 'अक्टूबर'सारख्या सिनेमा सिलेक्ट केले. तिला असे सिनेमा आवडतात.
काही दिवसांपूर्वी त्यांने अनुष्का शर्मासोबत 'सुई धागा'चे शूटिंग पूर्ण केले आहे. या सिनेमात वरुण धवन टेलरच्या भूमिकेत झळकणार असून 'मौजी' असं त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव असेल.दुसरीकडे अनुष्का कपड्यांवर नक्षीकाम (एम्ब्रॉयडरी) करणा-या ममताच्या भूमिकेत झळकणार आहे.'मेड इन इंडिया' अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमाची कथा मध्य प्रदेशात रंगणार आहे. यशरत कटारिया 'सुई धागा' या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून मनीष शर्मा सिनेमाचे निर्माते आहेत.यशराज बॅनरचा हा सिनेमा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.