दिग्दर्शक म्हणत राहिला CUT... CUT... तरीही वरुण धवन Kiss करत राहिला, Video चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 16:37 IST2025-01-13T16:37:34+5:302025-01-13T16:37:45+5:30

आता वरुण धवन याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Varun Dhawan-nargis Fakhri Intimate Bts Video Actor Continued To Scene Even Director Said Cut | दिग्दर्शक म्हणत राहिला CUT... CUT... तरीही वरुण धवन Kiss करत राहिला, Video चर्चेत

दिग्दर्शक म्हणत राहिला CUT... CUT... तरीही वरुण धवन Kiss करत राहिला, Video चर्चेत

Varun Dhawan-Nargis Fakhri video : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने २०१२ मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेत्याचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर वरुणने मागे वळून पाहिले नाही, तो अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत गेला. त्यानं आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. तसेच  अनेक चित्रपटांमध्ये रोमँटिक भूमिका साकारल्या आहेत. अशातच आता वरुण धवन याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो दिग्दर्शकाने  CUT... CUT... CUT... म्हटल्यावरही तो Intimate सीन देताना पाहायला मिळतोय. 

वरुण धवनचा 'मैं तेरा हिरो' हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात वरुणने इलियाना डिक्रूझ आणि नर्गिस फाखरीसोबत काम केलं होतं. आता 'मैं तेरा हिरो'च्या सेटवरील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये वरुण आणि नर्गिस हे  एक इंटिमेट सीन शूट करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसतं की दिग्दर्शकानं 'कट'म्हटल्यानंतरही वरुण सीन करताना दिसतोय. पण, यावेळी नर्गिस ही अस्वस्थ झाल्याचं दिसतं नाही. व्हिडीओमध्ये नर्गिस आणि क्रू मेंबर्स हसतात दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोलही केलं आहे. 

दरम्यान, अलीकडेच ईटाइम्सला  दिलेल्या मुलाखतीत नर्गिसने वरुण हा तिचा 'आवडता सह-कलाकार' असल्याचं म्हटलं होतं. "तो खरोखरच ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरलेला असतो" असं ती म्हणाली होती.  वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले तर अलिकडेच तो 'बेबी जॉन' सिनेमातही पाहायला मिळाला. पण बॉक्स ऑफिसवर तो सिनेमा फारसा यशस्वी झाला नाही. वरुण लवकरच ' सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: Varun Dhawan-nargis Fakhri Intimate Bts Video Actor Continued To Scene Even Director Said Cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.