वरुण धवन-नताशा दलालच्या लग्नाचं 2 फेब्रुवारीला 5 स्टार हॉटेलमध्ये होणार ग्रँड रिसेप्शन ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 13:52 IST2021-01-25T13:46:13+5:302021-01-25T13:52:47+5:30
मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित वरुण आणि नताशाचा लग्नसोहळा पार पडला.

वरुण धवन-नताशा दलालच्या लग्नाचं 2 फेब्रुवारीला 5 स्टार हॉटेलमध्ये होणार ग्रँड रिसेप्शन ?
वरुण धवन आणि नताशा दलाल या चाहत्यांनी बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती, अखेर 24 जानेवारीला दोघे लग्नाच्या बंधनात अडकले. कोरोनामुळे या लग्नामध्येही नियमांचे पालन करण्यात आले आणि मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित लग्नसोहळा पार पडला. रिपोर्टनुसार वरुण लग्नाचे ग्रँड रिसेप्शन देणार आहे..
अलिबागमधील मेन्शन हाऊस रिसॉर्टमध्ये भव्य लग्नानंतर वरुण आता 2 फेब्रुवारीला आपल्या लग्नाचे रिसेप्शन देणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पुढच्या आठवड्यात म्हणजेच 2 फेब्रुवारीला वरुण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शन देणार आहे.
वरूण व नताशा एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत आहेत. मात्र आत्ताआत्तापर्यंत दोघांनीही याचा कोणालाही थांगपत्ता लागू दिला नव्हता.
नताशा गेल्या अनेक वर्षांपासून वरुण धवनची गर्लफ्रेन्ड असली तरी तिने लाईम लाईट पासून स्वत:ला दूर ठेवले होते. नताशा आणि वरुण दोघे एकमेकांना अगदी शालेय जीवनापासून ओळखतात. तेव्हापासून जपलेल्या मैत्रीचे रुपांतर आता लग्नात झाले. शाळेच्या दिवसांपासून नताशाने वरुणला नेहमीच साथ दिली, असे स्वत: वरुणने करण जोहर यांच्या चॅट शोमध्ये सांगितले होते. नताशा एक फॅशन डिझायनर आहे. 2013 मध्ये नताशाने फॅशन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी न्यूयॉर्कमधून शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, तिने डिझायनिंग क्षेत्रातच काम सुरू केले.