​वरूण धवनला मनातल्या मनात छळतेयं ‘ही’ एकचं गोष्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 04:59 AM2018-03-29T04:59:59+5:302018-03-29T10:29:59+5:30

अनेकांसाठी यश हेच आयुष्यात सगळे काही असते. पण काही मोजक्या लोकांच्या आयुष्यात मात्र या यशापलीकडेही अनेक गोष्टी असतात. कदाचित ...

Varun Dhawan is the one thing that can be harassed in the mind. | ​वरूण धवनला मनातल्या मनात छळतेयं ‘ही’ एकचं गोष्ट!!

​वरूण धवनला मनातल्या मनात छळतेयं ‘ही’ एकचं गोष्ट!!

googlenewsNext
ेकांसाठी यश हेच आयुष्यात सगळे काही असते. पण काही मोजक्या लोकांच्या आयुष्यात मात्र या यशापलीकडेही अनेक गोष्टी असतात. कदाचित म्हणूनच यशाच्या शिखरावर असलेल्यांच्या मनातही एक अनामिक रिकामेपणं भरून राहिलेलं, आपण पाहतो. अभिनेता वरूण धवन हा सुद्धा यापैकीचं एक़ वरूणला पाहिल्यानंतर त्याच्याइतका दुसरा कुणीही आनंदी नसावा, असे अनेकांना वाटेल. इतक्या लहान वयात वरूणने खूप काही मिळवले. यश, ऐश्वर्य, प्रसिद्धी, पैसा सगळे काही. पण इतके अपार यश मिळवूनही वरूणला आतल्या आत काही तरी छळतयं. होय, आपल्या लोकांपासून दूर जात असल्याची एक भावना वरूणला स्वस्थ बसू देत नाहीये. अलीकडे एका मुलाखतीत ही गोष्ट त्याने बोलून दाखवली. ‘तुमच्याकडे यश आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे. पण तुमच्यावर सर्वाधिक प्रेम करणाºया लोकांसाठी तुमच्याकडे वेळ नाही. माझ्यामते, यापेक्षा वाईट गोष्ट कुठलीही असू शकत नाही. मला सध्या वारंवार ही एकच भावना छळतेय. मी इतका व्यस्त असतो की, माझ्याकडे माझ्या आपल्यांसाठीही वेळ नाही. मॉम डॅडला मी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. माझा चुलत भाऊ गंभीर आजारी होता. पण मी त्याला पाहायलाही जाऊ शकलो नाही. एकप्रकारे मी लोकांच्या मनोरंजनासाठी काम करतो. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खपतो. त्यामोबदल्यात मला पैसा, प्रसिद्धी, यश मिळते. पण हे यश म्हणजे, दुधारी तलवार आहे. ती कायम जवळ बाळगणे कठीण आहे. शेवटी काही ना काही कमतरता राहू जातेच. मी आज कितीही कष्ट करणार असलो तरी मी अनेकांना पूर्णपणे समाधानी करू शकत नाहीच. अशास्थितीत मी केवळ यासाठी स्वत:ला नशीबवान मानतो की, माझ्यावर नि:स्वार्थ प्रेम करणारी काही माणसं माझ्याकडे आहेत. ते मला समजून घेतात, ’ असे वरूण म्हणाला.
लवकरचं वरूणचा ‘अक्टूबर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. याशिवाय ‘सुई धागा’ या चित्रपटातही वरूण दिसणार आहे.

ALSO READ : ​राहत फतेह अली खान यांच्या आवाजातील ‘अक्टूबर’चे ‘तब भी तू...’ गाणे रिलीज! पाहा, व्हिडिओ!!

Web Title: Varun Dhawan is the one thing that can be harassed in the mind.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.