वरूण धवनचा खुलासा; म्हणून कॅटरिना कैफने सोडला ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 14:42 IST2019-04-19T14:39:46+5:302019-04-19T14:42:10+5:30
वरूण धवन व श्रद्धा कपूर लवकरच ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या चित्रपटात झळकणार आहेत. तुम्हाला ठाऊक असेलच की, सर्वप्रथम कॅटरिना कैफ ही चित्रपटासाठी मेकर्सची पहिली पसंत होती. पण अचानक कॅटरिना बाद झाली आणि या चित्रपटात श्रद्धाची वर्णी लागली. असे का? याचा खुलासा आत्ता कुठे झालाय.

वरूण धवनचा खुलासा; म्हणून कॅटरिना कैफने सोडला ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’!
ठळक मुद्दे ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’मध्ये वरुण एका पंजाबी तरुणाची भूमिका वठविणार असून श्रद्धा एका पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.
वरूण धवन व श्रद्धा कपूर लवकरच ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या चित्रपटात झळकणार आहेत. तुम्हाला ठाऊक असेलच की, सर्वप्रथम कॅटरिना कैफ ही चित्रपटासाठी मेकर्सची पहिली पसंत होती. पण अचानक कॅटरिना बाद झाली आणि या चित्रपटात श्रद्धाची वर्णी लागली. असे का? याचा खुलासा आत्ता कुठे झालाय. खुद्द वरूण धवनने अलीकडे याबाबतचा खुलासा केला.
‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या चित्रपटात कॅटरिना कैफसोबत काम करायला मिळणार, म्हणून मी आनंदात होतो. माझ्यासाठी ही मोठी संधी होती. आमची जोडी प्रथमच पडद्यावर एकत्र दिसणार होती. पण कॅट व माझ्या डेट्स मॅच होत नव्हत्या. कॅटरिना या चित्रपटासाठी कमालीची उत्सुक होती. तिने मला आणि मेकर्सला चित्रपटाच्या डेट्स लांबणीवर टाकण्याची विनंतीही केली होती. पण ते शक्य नव्हते. चित्रपट सोडण्यापूर्वी ती सर्वांशी बोलली. पण काहीही मार्ग निघत नाही म्हटल्यावर तिने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. ती बाद झाल्यानंतर तिच्याजागी श्रद्धा कपूरची वर्णी लागली, असे वरूणने यावेळी सांगितले.
वरूण धवन-श्रद्धा कपूर स्टारर ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ रेमो डिसूजा दिग्दर्शित करतोय. रेमोचा हा डान्स बेस्ड चित्रपट ‘एबीसीडी’ या सुपरहिट फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. आधी या चित्रपटाचे नाव ‘रुल ब्रेकर्स’ असे असल्याचे सांगितले गेले. मात्र आता ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या नावाने हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा व वरूणसोबत नोरा फतेही ही सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’मध्ये वरुण एका पंजाबी तरुणाची भूमिका वठविणार असून श्रद्धा एका पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.