एका महिन्यात दुसऱ्यांदा वरुण धवनला दुखापत, फोटो शेअर करत म्हणाला "बरं होण्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:51 IST2025-03-26T13:51:26+5:302025-03-26T13:51:41+5:30

वरुण धवण आगामी काळात काही दमदार चित्रपटांत दिसणार आहे.

Varun Dhawan Suffered An Injury In Finger While Shooting Of His Upcoming Projects | एका महिन्यात दुसऱ्यांदा वरुण धवनला दुखापत, फोटो शेअर करत म्हणाला "बरं होण्यासाठी..."

एका महिन्यात दुसऱ्यांदा वरुण धवनला दुखापत, फोटो शेअर करत म्हणाला "बरं होण्यासाठी..."

Varun Dhawan Suffered An Injury: वरुण धवन हा हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रटात काम केलं असून ते सुप्रसिद्धही ठरले आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांने रसिकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. वरुण गेल्या १२ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करतोय. त्याचे अनेक चित्रपट हिट ठरलेत. वरुण धवन  सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. चांगली बातमी असो वा वाईट, तो नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करतो. आता त्याने अशीच एक बातमी दिली आहे. ज्यामुळे त्याचे चिंतेत पडले आहेत. 

 वरुण धवनला दुखापत झाली आहे. त्याच्या हाताची बोट जखमी झालेत. याचा फोटोतही त्याने शेअर केलाय.  कॅप्शनमध्ये "हाताची बोट बरं होण्यासाठी किती वेळ लागेल", असा प्रश्न विचारत त्याने हा फोटो पोस्ट केलाय. यात बोटाला सूज आल्याचं दिसतंय. वरुण वेदना कमी करण्यासाठी बर्फाचा वापर करताना देखील दिसतोय. याआधीही गेल्या महिन्यात 'बॉर्डर २' च्या सेटवर शूटिंग करताना वरुणलाही दुखापत झाली होती. तसेच त्याने

वरुण धवन सध्या 'बॉर्डर २' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच त्याच्या 'है जवानी तो इश्क होना है' या सिनेमाचेही ऋषिकेशमध्ये शुटिंग सुरू आहे. अलिकडेच त्याने अभिनेत्री पूजा हेडेसोबत रिव्हर राफ्टिंगचा एक सीन शूट केला होता. हा चित्रपट वरुणचे वडील आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डेव्हिड धवन दिग्दर्शित करत आहेत. याशिवाय, वरुणकडे 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' हा चित्रपटही आहे. 

Web Title: Varun Dhawan Suffered An Injury In Finger While Shooting Of His Upcoming Projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.