वरूण धवनची ‘ही’ अभिनेत्री चित्रपटाच्या सेटवर करतेय ‘हेवी डाएट’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 17:25 IST2019-10-13T17:24:39+5:302019-10-13T17:25:04+5:30
‘कुली नं.१’ या चित्रपटाच्या रिमेकमधून वरूण धवन आणि सारा अली खान ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या चित्रपटाच्या सेटवर प्रचंड धम्माल होत असते, हे तर आपल्याला माहिती आहे.

वरूण धवनची ‘ही’ अभिनेत्री चित्रपटाच्या सेटवर करतेय ‘हेवी डाएट’!
बॉलिवूडचा चीची अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांची ‘कुली नं. १’ या चित्रपटातील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली. आता याच चित्रपटाच्या कथानकाला नवा तडका देऊन या चित्रपटाचा रिमेक येतोय. या चित्रपटात वरूण धवन आणि सारा अली खान ही फ्रेश जोडी दिसणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरून वेगवेगळया बातम्या समोर येतच असतात. पण, आता जी बातमी आमच्या हाती आलीय ती तुम्हाला कळालीच पाहिजे.
‘कुली नं.१’ या चित्रपटाच्या रिमेकमधून वरूण धवन आणि सारा अली खान ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या चित्रपटाच्या सेटवर प्रचंड धम्माल होत असते, हे तर आपल्याला माहिती आहे. मात्र, वरूण धवनने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यात एक जेवणाचे ताट दिसत आहे. या ताटात ब्रेडचे तुकडे, काकडीचे काप आणि भाजी एवढेच पदार्थ दिसत आहेत. आता तुम्ही म्हणाल, हे ताट कुणाचे? तर हे ताट आहे अभिनेत्री सारा अली खानचे. ती तिच्या डाएटविषयी खूप कडक असल्याचे समजतेय. चित्रपटाच्या सेटवर देखील ती तिचे डाएट पाळत असल्याचे वरूण सांगतोय. गणेश आचार्यने कोरिओग्राफ केलेल्या गाण्याचे शूटिंग सध्या सुरू आहे.
सारा अली खान ही डाएटबद्दल खूप स्ट्रिक्ट आहे, हे तर आपण के दारनाथपासून आपण पाहतोच. तिची फॅट टू फिट जर्नी आपण पाहिली आहे. तिने स्थूलपणावर मात करून स्वत:ला अगदी हॉट बनवले आहे. हे डाएट ती जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी फॉलो करते, असे तिने सांगितले आहे.