Baby John OTT Release: ओटीटीवर प्रदर्शित होणार 'बेबी जॉन' कधी आणि कुठे येईल पाहता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 16:57 IST2025-01-13T16:57:16+5:302025-01-13T16:57:30+5:30
'बेबी जॉन' हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Baby John OTT Release: ओटीटीवर प्रदर्शित होणार 'बेबी जॉन' कधी आणि कुठे येईल पाहता?
Baby John OTT Release : बॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) नुकताच 'बेबी जॉन' हा चित्रपट प्रदर्शित झाला. १८० कोटी बजेट असलेल्या या सिनेमाकडून मोठ्या कमाईची अपेक्षा होती. मात्र, 'बेबी जॉन' बॉक्स ऑफिसवर पुरता आपटला आहे. या चित्रपटात कीर्ती सुरेश, जॅकी श्रॉफ, वामिका गब्बी, राजपाल यादव आणि शीबा चड्ढा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्याचबरोबर बऱ्याच मोठं मोठ्या प्लॅटफॉर्मवर या सिनेमाचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन करण्यात आलं होतं. पण, तेवढं यश मिळालं नाही.
'बेबी जॉन' हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याबद्दल मोठी अपडेट देखील समोर आली आहे. 'बेबी जॉन' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाला स्ट्रीमिंगसाठी लोकप्रिय प्लॅटफॉर्म Amazon Prime Videoचा पाठिंबा मिळाल्याचे वृत्त आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात Amazon Prime Videoवर उपलब्ध होईल. तथापि, निर्मात्यांनी किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले तर तो लवकरच ' सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. तसेच तो 'बॉर्डर २'मध्येही पाहायला मिळणार आहे. तर २०२५ ची सुरुवातही त्याने एका खास गोष्टीने केली आहे. वरुण धवनने नववर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईत आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. मुंबईतील प्राइम लोकेशनमध्ये असलेल्या या फ्लॅटसाठी वरुण धवनने २.६७ कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. तर या घराची किंमत तब्बल ४४.५२ कोटी इतकी आहे.