'लाज कशी वाटत नाही' , वरुन धवनची अंडरवियर जाहिरात वादात, काय आहे नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 01:09 PM2021-09-07T13:09:37+5:302021-09-07T13:11:29+5:30
वरुन धवन लक्स कोझी अंडरविरच्या जाहिरातीत झळकला आणि तिथेच नेटीझन्सने त्याच्यावर निशाणा साधला. मुळात ही जाहिरात दोन कारणांमुळे वादात सापडली आहे.
वरुन धवन त्याच्या एका कमर्शियल जाहीरातीमुळे वादाच्या भोव-यात अडकला आहे. वरुन धवन लक्स कोझी अंडरविरच्या जाहिरातीत झळकला आणि तिथेच नेटीझन्सने त्याच्यावर निशाणा साधला. मुळात ही जाहिरात दोन कारणांमुळे वादात सापडली आहे. पहिले म्हणजे अमूल माचो कंपनीने या जाहिराती कॉपी केल्याचे आरोप लक्स कोझी कंपनीवर लावला आहे. वरुण धवनची ही जाहिरात अमुल माचोच्या 2007 साली आलेल्या टोइंग अंडरवेअर जाहिरातीशी मिळती जुळती आहे. तर दुसरे कारण म्हणजे नेटीझन्स वरूण धवनच्या लक्स कोझी जाहिरातीवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत आहेत.
लक्स कोजीची ही जाहिरात पाहून अनेक लोक संतापले आहेत. एका युजर्सने लिहिले की, जरा विचार करा की, वरुन धवनच्याजागी कोण्या एका महिलेने जर जाहीरातीत काम केले असते तर समाजाने तिव्र विरोध करण्यास सुरुवात केली असती.
दुसऱ्या एका युजरने लिहिले, या लोकांना अश्लीलता पसरवण्यात जराही लाज वाटत नाही. ओव्हरएक्टिंगची दुकान अशा प्रकारच्या टीका वरुन धवनवर उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. वरूण धवनची ही जाहिरात बकवास असल्याचे म्हणत संताप व्यक्त करत आहेत.
अमूल माचो कंपनीने एडवर्टाइजिंग स्टैंडर्ड्स काउंसिल ऑफ इंडिया (ASCI) कडे या संदर्भात लक्स कोझी कंपनीच्या विरोधात तक्रार केली आहे. माचो इनरवेअरचे निर्माते जे.जी. होजियरी यांनी दोन्ही जाहिरातींमध्ये समानता निदर्शनात आणून देत स्पष्टीकरण दिले आहे. जाहीरातेची थीम सगळ्याच गोष्टी कॉपी केल्या आहेत. यावरुन अमूल माचोने लक्स कोझीवर चोरी केल्याचा आरोप केला आहे. 2007 मध्ये आलेल्या अमूल माचोच्या टोईंग जाहीरातील बरीच लोकप्रियता मिळाली होती. लोकांना ही जाहिरात आजही चांगलीच लक्षात आहे. ही जाहिरात त्यावेळी खूप लोकप्रिय झाली होती. याच जाहीरातीमुळे सना खान प्रकाशझोतात आली होती.
वरुन धवनला पहिल्यांदाच अशा प्रकारे ट्रोल केले जात आहे असे नाही. यापूर्वीही त्याला वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल केले गेले होते. विनाकारण ट्रोल केल्या गेल्यामुळे वरुनही गप्प बसला नाही. उगाचच ट्रोल केल्यानंतर त्याने युजरला सणसणीत उत्तर दिलं होतं. ट्रोलिंगचे वाढते प्रमाण पाहून वरुन धनवनेही वेळीच युजर्सची बोलती बंद करतो.