वरूण धवन दिसणार 'ह्या' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 09:11 IST2018-10-30T13:18:15+5:302018-10-31T09:11:45+5:30

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'बदलापूर' चित्रपटाचा सीक्वल येत असून यामध्ये वरूण धवन काम करणार आहे.

Varuna Dhawan will appear in the sequel of 'This' movie | वरूण धवन दिसणार 'ह्या' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये

वरूण धवन दिसणार 'ह्या' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये

ठळक मुद्देवरूण धवन दिसणार 'बदलापूर २'मध्ये 'बदलापूर' सिनेमाचा दूसरा भाग बनविण्याची तयारी सुरू

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो वरूण धवनचा नुकताच 'सुई-धागा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या सिनेमातील या दोघांच्या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूक झाले. सध्या वरूण आगामी चित्रपट 'कलंक'मध्ये व्यग्र आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'बदलापूर' चित्रपटाचा सीक्वल येत असून यामध्ये वरूण धवन काम करणार आहे. 

वरूण धवन हा आपल्या 'बदलापुर' या पहिल्या सुपरहिट सिनेमाच्या दुसऱ्या भागात म्हणजेच 'बदलापूर २' चित्रपटामध्ये काम करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 'बदलापूर' सिनेमाचा दूसरा भाग बनविण्याची तयारी सुरू झाली आहे. 'बदलापूर' सिनेमाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी यासंदर्भात स्पष्ट केले आहे. सिनेमाची स्क्रिप्ट लिहण्याचे काम चालू असून 'बदलापूर-२' हा बदलापूरचा सिक्वल असणार नाही. 'बदलापूर-२' या सिनेमाची निर्मिती दिनेश विजन हे करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘बदलापुर-2’ या सिनेमाची कथा पहिल्या भागाच्या पुढची कथा असणार नाही. या सिनेमाची स्टोरी पूर्णपणे वेगळी असून नवीन कथा असल्याचे समजते आहे. सिनेमाचे शूटिंग सुरू होण्याची घोषणा ही आगामी वर्षात केली जाणार आहे. 'बदलापूर-२'मध्ये वरूण धवन याच्यासह नवाजुद्दीन सिद्धीकी, राधिका अापटे आणि हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
वरूण धवन बदलापूर चित्रपटाच्या सीक्वलसह 'कुली नं १' सिनेमाच्या रिमेकमध्ये गोविंदाच्या जागी वरूण धवन दिसणार आहे. या सिनेमाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असून चित्रपटाची नायिकाही लवकर फायनल करण्यात येणार आहे. 'कुली नं.१' चित्रपट १९९५ मध्ये प्रदर्शित झाला होता. यातील गाणे हिट ठरले होते आणि चित्रपटाला प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळाला होता. यामुळेच याचा रिमेक बनविण्यात येत आहे.

Web Title: Varuna Dhawan will appear in the sequel of 'This' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.