प्रतीक्षा संपली! अॅटलीची कीर्ती सुरेश-वरुण धवनसोबत 'VD 18' ची घोषणा, मुहूर्त पुजेचा व्हिडीओ आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 15:31 IST2024-01-14T15:29:28+5:302024-01-14T15:31:16+5:30
ब्लॉकबस्टर दिग्दर्शक अॅटली पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणार आहे.

प्रतीक्षा संपली! अॅटलीची कीर्ती सुरेश-वरुण धवनसोबत 'VD 18' ची घोषणा, मुहूर्त पुजेचा व्हिडीओ आऊट
शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपटानंतर ब्लॉकबस्टर दिग्दर्शक अॅटली पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणार आहे. अॅटलीने आजवर थरार आणि अॅक्शन असलेले अनेक सिनेमे बनवले आहेत. आता त्याच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अॅटली 'वीडी 18' (VD 18) सिनेमातून आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात वरुण धवन मुख्य भुमिकेत आहे. आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने 'VD 18' च्या मुहूर्त पूजेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
अॅटलीच्या आगामी 'व्हीडी 18' या चित्रपटाची बरीच चर्चा सुरू होती. अखेर निर्मात्यांनी अधिकृतरित्या आज (14 जानेवारी 2024) चित्रपटाची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी 'VD 18' चित्रपटाच्या मुहूर्त पूजेचा व्हिडीओ शेअर केला. पुजेमध्ये अॅटली, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि स्टारकास्ट उपस्थित होते. यावेळी वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी पारंपारिक लूकमध्ये दिसले.
'VD 18' हा एक अॅक्शन चित्रपट आहे. वरुण धवन पहिल्यांदाच कीर्ती आणि वामिकासोबत पडद्यावर दिसणार आहे. कीर्ती पहिल्यांदाच हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. त्याचबरोबर वामिकाही मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. तमिळ दिग्दर्शक कॅलिसच्या दिग्दर्शनाखाली बनणारा हा सिनेमा अॅटली कुमारच्या प्रोडक्शन अंतर्गत असणार आहे. अॅटली ज्योती देशपांडे आणि मुराद खेतानी यांच्यासोबत 'VD18' ची निर्मिती करत आहे. अॅटली या सिनेमाबाबतीत कोणतीच कसर सोडणार नाही हे नक्की.