Video: अचानक जॉन अब्राहमचा पारा चढला! पत्रकाराने असं काय विचारलं की अभिनेत्याचा संयम सुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 09:55 AM2024-08-02T09:55:34+5:302024-08-02T09:56:23+5:30

जॉन अब्राहम पत्रकाराच्या एका प्रश्नावर रागाने लालबुंद झालेला दिसला. नेमकं काय घडलं बघा (john abraham)

vedaa actor john abraham loses his temper after journalist ask him question | Video: अचानक जॉन अब्राहमचा पारा चढला! पत्रकाराने असं काय विचारलं की अभिनेत्याचा संयम सुटला

Video: अचानक जॉन अब्राहमचा पारा चढला! पत्रकाराने असं काय विचारलं की अभिनेत्याचा संयम सुटला

काल जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ यांच्या 'वेदा' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आला. निखिल अडवाणी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. जॉन-शर्वरी या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या सिनेमाच्या ट्रेलर लॉंचला पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नावर जॉनला संयम ढासळलेला दिसला. त्याने पत्रकाराला चांगलंच सुनावलेलं दिसलं. 

 पत्रकाराला असं काय विचारलं की जॉन चिडला

जॉनच्या 'वेदा' सिनेमाचा ट्रेलर लॉंच काल झाला. या सिनेमाच्या ट्रेलर लॉंचला पत्रकारांनी जॉनला अनेक प्रश्न विचारले. एका पत्रकाराने जॉनला विचारलं की, "सध्या तुम्ही वारंवार एकाच प्रकारचे रोल करत आहात. विशेषतः तुम्ही अ‍ॅक्शन सिनेमांकडे जास्त लक्ष देत आहात. असं का करत आहात? काहीतरी नवीन आमच्या भेटीला घेऊन या." पत्रकाराने हा प्रश्न विचारताच जॉनचा संयम ढासळला.


जॉनने पत्रकाराला सर्वांसमोर सुनावलं

पत्रकाराच्या प्रश्नावर जॉन चांगलाच चिडलेला दिसला. जॉन उत्तर देताना म्हणाला, "तुम्ही फिल्म बघितलीय? तुम्ही मूर्ख आहात आणि हा खूप वाईट प्रश्न आहे असं मी बोलू शकतो का? तुम्ही आधी फिल्म बघा आणि त्यानंतर आम्हाला जज करा. त्यानंतर तुम्ही जे काही बोलाल ते मी ऐकेल. मी एवढंच सांगेन की हा सिनेमा वेगळा आहे. मी या सिनेमात खूप इंटेंस परफॉर्मन्स दिलाय. तुम्ही सिनेमा न बघता घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका." अशाप्रकारे पुढे जॉनने त्या पत्रकाराला त्याचं नाव विचारलं. "तुझा चेहरा लक्षात ठेवलाय", असंही सांगितलं. जॉन अब्राहमचा आगामी 'वेदा' सिनेमा १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Web Title: vedaa actor john abraham loses his temper after journalist ask him question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.