'वीर-जारा' पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर, या दिवशी भेटीला येणार शाहरूख-प्रितीचा रोमँटिक ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 04:31 PM2024-09-06T16:31:34+5:302024-09-06T16:32:51+5:30

Veer-Zara Movie : शाहरुख खान आणि प्रिती झिंटाचा 'वीर-जारा' हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती शेअर केली आहे.

'Veer-Zara' will be seen again on the silver screen, the romantic drama of Shahrukh-Preity will meet on this day | 'वीर-जारा' पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर, या दिवशी भेटीला येणार शाहरूख-प्रितीचा रोमँटिक ड्रामा

'वीर-जारा' पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर, या दिवशी भेटीला येणार शाहरूख-प्रितीचा रोमँटिक ड्रामा

शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि प्रीती झिंटा (Priti Zinta) यांची 'वीर-जारा' (Veer-Zara Movie) ही प्रेमकथा पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपट निर्माते यश चोप्रा यांची सिनेमातील जादू लोकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. वीर-जारा हा शाहरुख खानच्या सर्वोत्तम रोमँटिक चित्रपटांपैकी एक आहे. शाहरुखचा क्वचितच असा कोणताही चाहता असेल ज्यांच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश नाही. चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्याच्या घोषणेने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

शाहरुख खान आणि प्रिती झिंटाचा रोमँटिक ड्रामा चित्रपट १३ सप्टेंबरला पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यशराज फिल्म्सच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाच्या पुन्हा रिलीजची माहिती शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये लिहिले होते, 'स्वर्गात बनलेली वीर-जारा जोडी शुक्रवारी, १३ सप्टेंबरला थिएटरमध्ये परतत आहे! तुमच्या जवळच्या सिनेपोलिस स्क्रीनवर पाहा!'

चाहते झाले उत्सुक
चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळताच चाहते उत्साहित झाले. एका सोशल मीडिया यूजरने कमेंट केली, वॉव. पुन्हा सिनेमा पाहण्यासाठी वाट पाहू शकत नाही. दुसऱ्या यूजरने लिहिले, 'दिवसाची सर्वोत्तम बातमी.' वीर-जारा हा एक सुंदर चित्रपट आहे.

'वीर-जारा' ही प्रेम आणि त्यागाची कथा
यश चोप्रा दिग्दर्शित, वीर-जारा ही प्रेम, त्याग आणि आशा यांची सशक्त कथा आहे. यासोबतच ही कथा सीमा आणि पिढ्या ओलांडते. या चित्रपटात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, राणी मुखर्जी, दिव्या दत्ता आणि मनोज वाजपेयी यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटात भारतीय हवाई दलाचा पायलट वीर प्रताप सिंग (शाहरुख खान) आणि पाकिस्तानी महिला झारा हयात खान (प्रीती झिंटा) यांची अमर प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.

Web Title: 'Veer-Zara' will be seen again on the silver screen, the romantic drama of Shahrukh-Preity will meet on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.