चंदन तस्करी अन् शेकडो लोकांची हत्या करणाऱ्या वीरप्पनवर सिरीज, Netflix ने रिलीज केले ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 06:38 PM2023-07-27T18:38:55+5:302023-07-27T18:43:17+5:30

The Hunt For veerappan Trailer: वीरप्पनवर पोलिसांसह शेकडो लोकांची आणि 2000 हून अधिक हत्तींची हत्या केल्याचा आरोप आहे.

veerappan story: The series on Veerappan who killed hundreds of people, Netflix released the trailer | चंदन तस्करी अन् शेकडो लोकांची हत्या करणाऱ्या वीरप्पनवर सिरीज, Netflix ने रिलीज केले ट्रेलर

चंदन तस्करी अन् शेकडो लोकांची हत्या करणाऱ्या वीरप्पनवर सिरीज, Netflix ने रिलीज केले ट्रेलर

googlenewsNext

The Hunt For veerappan Trailer: नेटफ्लिक्स लवकरच 'द हंट फॉर वीरप्पन' नावाची डॉक्यूमेंट्री सिरीज घेऊन येत आहे. ही सिरीज दक्षिण भारतातील कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनवर आधारित आहे. नेटफ्लिक्सने गुरुवारी या सिरीजचे ट्रेलर रिलीज केले, ज्यामध्ये वीरप्पनच्या गुन्ह्यांची झलक पाहायला मिळत आहे.

ट्रेलरची सुरुवात व्हॉईस-ओव्हरने होते, ज्यामध्ये वीरप्पनच्या गुन्ह्यांची माहिती दिली जात आहे. वीरप्पन सर्वात मोठा गुन्हेगार आहे, त्याने 119 लोकांची हत्या केल्याचेही या ट्रेलरमध्ये सांगण्यात आले आहे. हा ट्रेलर शेअर करताना नेटफ्लिक्सने लिहिले की, "एका तस्कराची माफिया बनण्याची कहाणी."

कोण आहे वीरप्पन?
जुन्या लोकांना वीरप्पनबद्दल नक्कीच माहिती आहे. पण, ज्यांना माहिती नाही, त्यांसाठी, वीरप्पन हा दक्षिण भारतातील सर्वात मोठा चंदन तस्कर होता. त्याची दहशत अनेक राज्यांमध्ये होती. पोलिसांसह शेकडो लोकांना ठार मारण्याबरोबरच त्याने 2000 हून अधिक हत्तींचीही शिकार केल्याचे सांगितले जाते. हत्तींची शिकार केल्यानंतर तो त्यांच्या दातांची तस्करी करायचा. तामिळनाडू स्पेशल टास्क फोर्सने वीरप्पनचा खात्मा केला होता.

सिरीज कधी रिलीज होत आहे?
ही सिरीज 4 ऑगस्ट रोजी हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधीही वीरप्पनची कथा मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आली आहे. 2016 मध्ये वीरप्पनवर याच नावाने एक चित्रपट आला होता, ज्यामध्ये अभिनेता संदीप भारद्वाजने त्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले होते. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओ आणि Disney Plus Hotstar वर उपलब्ध आहे. 

Web Title: veerappan story: The series on Veerappan who killed hundreds of people, Netflix released the trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.