ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 11:49 AM2019-06-05T11:49:10+5:302019-06-05T11:58:59+5:30
सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
मुंबईः सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.
दिनयार यांनी अनेक चित्रपटांत काम केले. बाजीगर, ३६ चायना टाऊन, खिलाडी, बादशाह अशा अनेक चित्रपटांत ते दिसले. अनेक लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. हम सब एक है ही मालिका अनेक वर्षांपूर्वी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. त्या मालिकेतील त्यांची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. या मालिकेतील मेरे पास बहोत पैसा है हा त्यांचा संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे
दिनयार यांनी थिएटर आर्टिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गुजराती आणि हिंदी नाटकांमध्ये त्यांनी काम केले. याचवर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
PM Modi: Padma Shri Dinyar Contractor was special because he spread lots of happiness. His versatile acting brought smiles on several faces. Be it theatre, television or films, he excelled across all mediums. Saddened by his demise. My thoughts are with his family and admirers. pic.twitter.com/tABpiKYkW1
— ANI (@ANI) June 5, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शोकसंवेदना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनयार यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांनी अनेकांच्या चेह-यांवर हास्य फुलवले. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, असे मोदींनी आपल्या ट्विटवरील शोकसंदेशात म्हटले आहे.