ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी काळाच्या पडद्याआड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2017 09:35 AM2017-01-06T09:35:55+5:302017-01-06T14:18:03+5:30
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. ओंम ...
ज येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. ओंम पुरी यांचं पार्थिव सध्या अंधेरीतली त्यांच्या घरी ठेवण्यात आले आहे.
बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. ओम पुरी यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरलीय.
ओम पुरी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950मध्ये हरियाणामधल्या अंम्बाला शहरात झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण पंजाबमधल्या पटियालामध्ये झाले.
पुण्यात फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे ते विद्यार्थी होते. त्याच बरोबर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनयाचे शास्त्रयुक्त शिक्षण घेतले होते.
ओम पुरी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका मराठी नाटकाने केली होती. घाशिराम कोतवाल हे त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेले पहिले नाटक होते.
1981 साली आलेले आक्रोश या चित्रपटासाठी त्यांना पहिला फिल्म फेअर अॅवॉर्ड मिळाले तर आरोहन आणि अर्धसत्य या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
ओम पुरीने बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.
घायल वन्स अगेन हा त्यांचा हिंदीतील शेवटचा चित्रपट ठरला. एक अष्टपैलू कलाकार म्हणूऩ ओम पुरींची ओळख होती.
1990 त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जंगल बूकमधील बगिरा या व्यक्तिरेखेला त्यांना आवाज दिला होता.
शहिदांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे ते चर्चेत आले होते. ओंम पुरी यांना अनेक कलाकारांनी ट्विटवरुन श्रद्धांजली अर्पण केलीय.