मुंबई महापालिका म्हणजे मिशी अर्धी ठेवून पळून जाणाऱ्या सलूनवाल्यासारखी; राकेश बेदी भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:52 IST2025-01-08T17:52:18+5:302025-01-08T17:52:48+5:30
ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी मुंबई पालिकेवर ताशेरे ओढले आहेत. काय घडलंय नेमकं जाणून घ्या (rakesh bedi)

मुंबई महापालिका म्हणजे मिशी अर्धी ठेवून पळून जाणाऱ्या सलूनवाल्यासारखी; राकेश बेदी भडकले
राकेश बेदी हे मनोरंजन विश्वातील चतुरस्त्र अभिनेते. राकेश बेदींना आपण विविध मालिका, सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. 'श्रीमान श्रीमती', 'येस बॉस' या राकेश बेदींच्या आजही आवडीने पाहिल्या जातात. राकेश बेदींनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत त्यांनी मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत. याशिवाय मुंबई महापालिकेच्या अपूर्ण कामांवर बोट ठेवलंय. काय म्हणाले राकेश बेदी?
राकेश बेदी काय म्हणाले?
राकेश बेदी यांच्या घराजवळील रस्त्याचं बांधकाम सुरु होतं. त्यावेळी रस्त्याचा एक भाग बनवला गेलाय तर दुसरा भाग उकरुन अपूर्ण ठेवल्याचं राकेश बेदींचं म्हणणं आहे. राकेश बेदी म्हणाले, "हॅलो मित्रांनो. मी राकेश बेदी. मी माझ्या घरासमोर उभा आहे. तुम्ही या रस्त्याची अवस्था बघत असाल. हा रस्ता अर्धा बनवलाय आणि अर्धा रस्ता बीएमसीवाले असाच अपूर्ण ठेऊन गेलेत. जुन्या काळात सलूनवाले गिऱ्हाईकाची अर्धी मिशी कापायचे आणि अर्धी मिशी तशीच सोडून पळून जायचे. मग हे गिऱ्हाईक त्याला शोधत फिरत बसायचे. आमच्यासोबतही असंच झालंय."
राकेश बेदी पुढे म्हणाले की, "अर्धा रस्ता बनवून बीएमसी गायब आहे. कोणीतरी तक्रार केली तेव्हा कळलं की हा रस्ता बीएमसीचा नव्हता. इथे कोणीही काम करत नसून लोकांना खूप अडचणींना सामना करावा लागतोय. बीएमसीला सलाम केला पाहिजे. जर हा रस्ता बीएमसीचा नव्हता तर टेंडर पास कोणी केला? याचाच अर्थ हा बीएमसीचा रोड आहे. याच रस्त्यावर माझं घर असून इथून पुढे जॉनी लिव्हर आणि सोनू सूद राहतात." अशाप्रकारे राकेश बेदींनी त्यांचं म्हणणं सर्वांसमोर मांडलंय.