या कारणामुळे म्यानमारपासून भारतापर्यंत पायीच चालत आल्या होत्या हेलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 06:00 AM2021-06-11T06:00:00+5:302021-06-11T06:00:00+5:30

60च्या दशकात हेलन यांच्याकडे सेक्स सिम्बल म्हणून पाहिलं जाऊ लागलं. हेलन यांनी आपल्या डान्ससह सौंदर्यानं रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं.

veteran actress Helen had walked for nine months from Burma and reached India | या कारणामुळे म्यानमारपासून भारतापर्यंत पायीच चालत आल्या होत्या हेलन

या कारणामुळे म्यानमारपासून भारतापर्यंत पायीच चालत आल्या होत्या हेलन

googlenewsNext

हिंदी सिनेमांमध्ये आयटम नंबर सुरु करण्याचं श्रेय हे हेलन यांनाच जातं. दिलखेचक अदा, घायाळ करणारं नृत्य यानं हेलन यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. कॅब्रे डान्स भारतात लोकप्रिय करण्याचं श्रेयसुद्धा हेलन यांनाच जातं. मात्र हेलन यांना करिअरच्या सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल सहन करावा लागला. 

जपाननं बर्मावर वर्चस्व स्थापित केले त्यावेळी अनेक कुटुंब स्थलांतरीत झाली. वडिलांच्या निधनानंतर हेलनही आपल्या कुटुंबासोबत मुंबईच्या दिशेने निघाल्या. यावेळी हेलन आणि त्यांच्या कुटुंबाने पायी चालत भारत गाठण्याचा निर्णय घेतला. पायी चालत भारतापर्यंत प्रवास करणे सोपं नव्हते.त्यांना त्यांच्या प्रवासादरम्यान प्रचंड संघर्षाचा सामना करावा लागला. भारतात पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक महिने चालत प्रवास केला. हेलन यांच्यासोबत आई आणि भाऊ होता. मात्र जेव्हा कोलकत्ताला पोहोचले तेव्हाच त्यांच्या भावाचे साथीच्या आजारामुळे मृत्यू झाला.

तर दुसरीकडे प्रवासादरम्यान आईचे मिसकॅरेज झाल्याने त्यांनी कोलकातामध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. याच ठिकाणी हेलनजींचा जगण्याचा आणि करिअरसाठी संघर्ष सुरु झाला. वयाच्या 19 वर्षी त्यांना हावडा ब्रिज या सिनेमात पहिली संधी मिळाली. यातील ''मेरा नाम चुन चुन'' या गाण्याने रसिकांना वेड लावलं. यामुळे बॉलीवुडच्या पहिल्या आयटम गर्ल अशी ओळख त्यांना मिळाली. 

60च्या दशकात हेलन यांच्याकडे सेक्स सिम्बल म्हणून पाहिलं जाऊ लागलं. हेलन यांनी आपल्या डान्ससह सौंदर्यानं रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं.प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या हेलन या ज्येष्ठ लेखक सलीम खान यांच्या दुस-या पत्नी आहेत. दबंग खान सलमानच्या हेलन या सावत्र आई आहेत. मात्र आई म्हणून सलमान त्यांचा आपल्या आई इतकाच आदर करतो.

Web Title: veteran actress Helen had walked for nine months from Burma and reached India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.