लोकप्रिय अभिनेत्रीच्या घरातील बाथरुमच्या भिंतीत सापडलेले १२ लाख, कोर्टात दिली खोटी साक्ष अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 01:20 PM2024-11-11T13:20:12+5:302024-11-11T13:25:36+5:30
बॉलिवूडमधील एक अशी लोकप्रिय अभिनेत्री होती. या अभिनेत्रीच्या बाथरुममध्ये तब्बल १२ लाख रुपयांची कॅश सापडलेली
बॉलिवूडमध्ये अशी अनेक रहस्य दडली आहेत जी वाचल्यावर आपण थक्क होऊन जातो. बॉलिवूडमधली अशी रहस्य जेव्हा बाहेर येतात तेव्हा आपल्याही भुवया उंचावल्या जातात. आज आम्ही तुम्हाला असंच एक रहस्य सांगणार आहोत. १९७८ साली बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी तब्बल १२ लाखांची कॅश सापडली होती. त्या काळात इतकी रक्कम सापडणं खूप मोठी गोष्ट होती. कोणाच्या घरी ही कॅश सापडली होती? पुढे काय झालं? जाणून घ्या.
या अभिनेत्रीच्या घरी सापडलेली १२ लाखांची कॅश
या अभिनेत्रीचं नाव माला सिन्हा.माला सिन्हा या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आज त्या ८८ वर्षांच्या झाल्या आहेत. माला सिन्हा करिअरच्या शिखरावर असताना त्यांच्या हातून मोठी चूक घडलेली. १९७८ साली माला यांच्या घरी इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची रेड पडली. त्यावेळी त्यांच्या घरातील बाथरुमच्या भिंतीमधून पोलिसांना १२ लाखांची कॅश सापडली. त्याकाळी इतकी रोख रक्कम एका अभिनेत्रीकडे मिळाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पुढे हे प्रकरण कोर्टात गेलं.
Born as Alda Sinha into a family of Nepali origin. She worked as a singer with All India Radio and performed regularly in stage shows. Featured in 100+ Hindi & 20 Bengali films since her debut as a child actor.
— Film History Pics (@FilmHistoryPic) November 11, 2020
Birthday wishes to MALA SINHA pic.twitter.com/CwKmnGMITj
माला सिन्हांनी दिली खोटी साक्ष अन्...
स्वतः कमावलेले १२ लाख रुपये डोळ्यांसमोर निघून जात आहेत हे माला सिन्हांना पटत नव्हतं. पुढे प्रकरण कोर्टात गेल्यावर माला सिन्हांचे वडील आणि वकील यांनी त्यांना खोटी साक्ष द्यायला सांगून पैसे वाचवण्याचा उपाय सांगितला. माला सिन्हांनी कोर्टात सांगितलं की त्यांनी वेश्याव्यवसाय करुन हे पैसे मिळवले आहेत. या एका चुकीमुळे माला सिन्हांच्या करिअरवर मोठा परिणाम झाला. जी अभिनेत्री वर्षाला ५ -६ सिनेमांंचं शूटिंग एकत्र करायची तिच्याकडे केवळ १- २ सिनेमे येऊ लागले. आज माला सिन्हांचा वाढदिवस असून त्या ८८ वर्षांच्या झाल्या आहेत.