मौसमी चॅटर्जींवर जावई ठोकणार मानहानीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 01:57 PM2019-12-31T13:57:14+5:302019-12-31T13:59:01+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांची लेक पायल मुखर्जी हिचे नुकतेच निधन झाले. पायल दीर्घकाळापासून आजारी होती आणि यामुळे कोमात गेली होती.

veteran actress moushumi chatterjees son-in-law dicky sinha filing a defamation case against the actress | मौसमी चॅटर्जींवर जावई ठोकणार मानहानीचा दावा

मौसमी चॅटर्जींवर जावई ठोकणार मानहानीचा दावा

googlenewsNext
ठळक मुद्देयाआधी डिकीने मौसमी यांच्याबद्दल खळबळजनक  खुलासे केले होते.

बॉलिवूड अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांची लेक पायल मुखर्जी हिचे नुकतेच निधन झाले. पायल दीर्घकाळापासून आजारी होती आणि यामुळे कोमात गेली होती. यानंतर मौसमी यांनी पायलच्या पतीविरोधात कोर्टात केस दाखल केली होती. आता मात्र पायलच्या  पती डिकी सिन्हा मौसमी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याची तयारी चालवली आहे.
पायल एप्रिल 2018 मध्ये कोमामध्ये गेली होती. तिचा पती डिकी सिन्हा तिला रूग्णालयातून घरी घेऊन आला होता. मात्र यानंतर  पती डिकी पायलची योग्य ती काळजी घेत नसल्याचा शिवाय डिकीने पायलवरचे सगळे उपचार बंद केल्याचा आरोप करत मौसमी यांनी मुंबई हायकोटार्चा दरवाजा ठोठावला होता.

हा वाद बराच दिवस चालला आणि याचदरम्यान पायलने जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूनंतर पायलचा पती डिकी सिन्हाने मौसमी यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. आता त्याने मौसमीविरोधात मानहानीचा दावा ठोकण्याची तयारी सुरु केली आहे. एका ताज्या मुलाखतीत त्याने खुद्द ही माहिती दिली. ‘मी आत्तापर्यंत काहीही बोललो नाही. कारण मी पत्नीच्या देखभालीत बिझी होतो.  पायलच्या निधनानंतरचे विधी पूर्ण करण्यासाठी मला आणखी काही दिवस लागणार आहेत. पण जानेवारीत मी मौसमी यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकणार आहे. मी मनाचा निश्चय केला आहे,’ असे डिकीने यावेळी सांगितले.

याआधी केले होते खळबळजनक  खुलासे
याआधी डिकीने  स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत मौसमी यांच्याबद्दल खळबळजनक  खुलासे केले होते. ‘ माझ्यात आणि सासरच्या मंडळींमध्ये सर्व काही ठीक नव्हतेच. खरे तर मला त्यांच्याबद्दल काहीही समस्या नव्हती. मी केस जिंकली होती आणि पायल माझ्यासोबत राहत होती. तिच्या अखेरच्या क्षणीही ती माझ्यासोबत होती. मौसमी पायलची आई होत्या. पण पायलच्या मृत्यूनंतर त्यांनी तिचा चेहराही पाहिला नाही.त्या तिच्या अंतिम संस्कारालाही आल्या नाहीत. केवळ पायलचे वडिल आणि तिची बहीण अंत्यसंस्कारावेळी हजर होते. पायल जिवंत होती तेव्हा तिची बहीण मेघा हिने एकदा तिला बळजबरीने प्रसाद चारला. हा प्रसाद खाल्ल्यानंतर पायल जवळपास गंभीर झाली होती. त्या लोकांनी पायलच्या आजारपणाला इगो इश्यू बनवला. मी ज्याप्रमाणे पायलची काळजी घेत होतो, ते पाहून काही सेलिब्रिटींनी माझे कौतुक केले होते. यानंतर मौसमी यांनी माज्याशी वाद सुरु केलेत आणि हे वाद चव्हाट्यावर आणलेत. मी पहिल्यांदा याबद्दल बोलतोय. स्वत:ला स्वच्छ सिद्ध करण्यासाठी नाही तर सत्य समोर यावे, म्हणून मी बोलतोय,’असे डिकीने सांगितले होते.

Web Title: veteran actress moushumi chatterjees son-in-law dicky sinha filing a defamation case against the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.