Mumtaz : ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांचा वर्कआऊट Video व्हायरल, ७५ व्या वर्षीही आहेत 'सुपरफीट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 16:01 IST2023-02-23T15:59:48+5:302023-02-23T16:01:17+5:30
ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज 75 व्या वर्षीही कमालीच्या फीट आहेत.

Mumtaz : ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांचा वर्कआऊट Video व्हायरल, ७५ व्या वर्षीही आहेत 'सुपरफीट'
ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी ६०-७० च्या दशकात त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्याकाळी मुमताज यांना सिनेमात घेण्यासाठी दिग्दर्शक उत्सुक असायचे. आज मुमताज यांचे वय ७५ वर्षे आहे मात्र तरुणांनाही लाजवेल इतक्या त्या फीट आहेत. त्यांचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री मुमताज यांचा जिममधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काळा टीशर्ट आणि ग्रे रंगाच्या ट्राउझरमध्ये मुमताज लेग वर्कआऊट करत आहेत. त्यांचा फिटनेस पाहून सर्वच अवाक झालेत.
मुमताज यांनी ६० ते ७० च्या दशकात अनेक दमदार भूमिका केल्या. धर्मेंद्र यांच्यासोबत मुमताज यांची जोडी खूप हिट झाली. त्यांना बालकलाकार म्हणूनच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे है जबान पर' हे गाणं वाजलं की मुमताज यांचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. अनेक वर्षे काम केल्यानंतर त्यांनी बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. 'दो रास्ते', 'रोटी', 'आप की कसम', 'लोफर' अशा अनेक हिट चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.