सौमित्र चॅटर्जींनी नाकारले म्हणून अमिताभ यांना दोन यादगार सिनेमे मिळाले!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 02:04 PM2020-11-15T14:04:41+5:302020-11-15T14:08:55+5:30
प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे निधन
नामवंत बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन झाले आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. 6 ऑक्टोबरला त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर ते कोरोनामुक्त झाले होते पण तब्येत खालावली होती.
सत्यजीत राय यांच्या ‘अपूर संसार’ या चित्रपटाद्वारे सौमित्र चॅटर्जी यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर अनेक बंगाली सिनेमात त्यांनी यादगार भूमिका साकारल्या. हिंदीतही त्यांना अनेकदा भूमिका ऑफर झाल्यात. पण सौमित्र यांनी या भूमिका धुडकावल्या होत्या. यापैकीच एक म्हणजे, ‘आनंद’ सिनेमातील डॉ. भास्कर बॅनर्जीची भूमिका. शशी कपूर यांची निर्मिती असलेला आणि श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला ‘कलयुग’ या सिनेमालाही त्यांनी नकार दिला होता.
‘आनंद’साठी अमिताभ बच्चन नव्हते पहिली पसंत
‘आनंद’ या सिनेमात डॉ. भास्कर बॅनर्जीची भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली होती. मात्र या भूमिकेसाठी ते पहिली पसंत नव्हते. दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी ही भूमिका सर्वप्रथम सौमित्र चॅटर्जी यांना ऑफर केली होती. मात्र तारखांचा मे जमत नसल्याने सौमित्र यांनी ही भूमिका नाकारली होती. अर्थात ही भूमिका नाकारल्याचा त्यांना कोणताही पश्चाताप नव्हता.
‘कलयुग’ही नाकारला
श्याम बेनेगल यांचा 1981 साली रिलीज ‘कलयुग’ हा सिनेता महाभारतावर आधारित होता. हा सिनेमा अभिनेता शशी कपूर यांनी प्रोड्यूस केला होता. यात त्यांनी कर्णाची भूमिका साकारली होती. शशी यांनी या सिनेमात सौमित्र यांना धर्मराज युधिष्ठिरची भूमिका ऑफर केली होती. मात्र सौमित्र यांनी या भूमिकेसाठी विनम्र नकार कळवला. शशी व सौमित्र खूप चांगले मित्र होते. मात्र तरिही त्यांनी ही भूमिका नाकारली. आपल्या पहिल्या हिंदी सिनेमासाठी ही भूमिका योग्य नाही, असे सौमित्र यांना वाटल्याने त्यांनी हा सिनेमा करण्यास नकार दिला होता.
दिग्गज अभिनेता सौमित्र चॅटर्जींचं निधन, चाहत्यांनी जागवल्या आठवणी
‘पिंक’ सिनेमाही नाकारला
अमिताभ बच्चन यांचा ‘पिंक’ हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. यात जजच्या भूमिकेसाठी सर्वप्रथम सौमित्र चॅटर्जी यांना विचारणा झाली होती. मात्र ही भूमिका न आवडल्याने सौमित्र यांनी ती नाकारली होती. यानंतर अमिताभ यांनी ही भूमिका साकारली होती.