बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 07:01 PM2022-11-19T19:01:18+5:302022-11-19T19:01:26+5:30
१९४७ मध्ये बेबी तबस्सुम या नावाने बालकलाकार म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली होती
मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. अभिनेत्री ७८ वर्षांची होती. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. 'फूल खिले हैं गुलशन गुलशन' या शोसाठी त्या लोकप्रिय झाल्या होत्या.
२१ नोव्हेंबर रोजी आर्य समाज, लिंक रोड, सांताक्रूझ येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रामायणातील रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांची मेहुणी तबस्सुम गोविल(Tabassum Govil) त्यांच्या टॉक शो आणि लहान मुलांच्या भूमिकेसाठी ओळखली जात होती. १९४७ मध्ये बेबी तबस्सुम या नावाने बालकलाकार म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली होती. तबस्सुम या ८० आणि ९० च्या दशकातील एक मोठी स्टार होती.