ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक खय्याम रूग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 01:37 PM2019-08-11T13:37:52+5:302019-08-11T13:39:30+5:30
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांना रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांना रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. दीर्घकाळापासून ते फुफ्फुसाच्या आजाराने आजारी आहेत. याचदरम्यान प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने जुहूच्या सुजॉय रूग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
92 वर्षीय खय्याम यांचे जवळचे मित्र आणि गजल गायक तलत अजीज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खय्याम आयसीयूमध्ये आहेत. त्यांची स्थिती गंभीर पण स्थिर आहे.
1947 मध्ये फिल्मी करिअर सुरु करणाºया खय्याम यांनी अनेक गाण्यांना संगीत दिले. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती 1958 साली प्रदर्शित झालेल्या ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटाने. खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली या चित्रपटाची गाणी कमालीची लोकप्रिय झाली होती. कभी कभी, उमराव जान, फिर सुबह होगी अशा सुपरडुपर हिट चित्रपटांना त्यांना संगीत दिले. कभी कभी व उमराव जान या दोन चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
आपल्या 90 व्या वाढदिवसाला खय्याम यांनी सुमारे 12 कोटींची रक्कम ‘खय्याम प्रदीप जगजीत ट्रस्ट’ला दान केली होती.