Jamuna Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्री जमुना यांचं निधन, मनोरंजन विश्वावर पसरली शोककळा !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 01:11 PM2023-01-27T13:11:34+5:302023-01-27T13:12:31+5:30

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. दक्षिण भारतातील ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचं निधन झालं आहे. अनेक कलाकार त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

veteran south indian actress jamuna passes away at the age of 86 | Jamuna Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्री जमुना यांचं निधन, मनोरंजन विश्वावर पसरली शोककळा !

Jamuna Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्री जमुना यांचं निधन, मनोरंजन विश्वावर पसरली शोककळा !

googlenewsNext

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. दक्षिण भारतातील ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. जमुना यांनी शुक्रवारी हैदराबाद येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वहिली आहे.

१६व्या वर्षी केला होता डेब्यू 
जमुना यांचा जन्म 30 ऑगस्ट 1936 रोजी कर्नाटकातील हम्पी येथे झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील दुग्गीराला येथून केलं. जमुना यांचं खरं नाव जनाबाई होते आणि त्यांनी 1953 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी गरिकापरी राजा राव दिग्दर्शित 'पुट्टीलू' मधून करिअरची सुरुवात केली.

हिंदी सिनेमात देखील केलं काम
जमुना यांना खरी ओळख एलव्ही प्रसाद यांच्या 'मिसम्मा' (1955) मधून मिळाली. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भूमिका केल्या आणि त्यांच्या काळातील दिग्गज अभिनेत्यांसोबत अभिनय केला. त्यांनी तेलुगू, तामिळ आणि 11 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना सुनील दत्त आणि नूतन अभिनीत मिलन (1967) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देखील जिंकला. हा तेलगू चित्रपट मोगा मनसुलु (1964) चा रिमेक होता, ज्यात नागेश्वर राव आणि सावित्री यांच्यासोबत जमुना देखील होत्या.

राजकारणात होत्या सक्रिय 
चित्रपटांच्या दुनियेसोबतच या अभिनेत्रीने राजकारणातही नशीब आजमावले होते. काँग्रेसला पाठिंबा देऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. 1980 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रभावाने त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर 1989 मध्ये त्या राजमुंद्रीमधून लोकसभेवर निवडून आल्या. मात्र, 1991 मध्ये पराभव झाल्यानंतर त्यांनी राजकारण सोडले. नंतर तिने भाजपमध्ये प्रवेश केला आणि 1990 च्या उत्तरार्धात पक्षाचा प्रचार केला.

Web Title: veteran south indian actress jamuna passes away at the age of 86

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.