‘विकी डोनर’फेम अभिनेते भुपेश कुमार पांड्या यांचे निधन, अखेर कॅन्सरशी झुंज संपली
By रूपाली मुधोळकर | Published: September 24, 2020 10:09 AM2020-09-24T10:09:38+5:302020-09-24T10:13:44+5:30
भुपेश यांना फुफ्फुसाच्या कॅन्सरने गाठले होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
विकी डोनर आणि हजारों ख्वाहिशें ऐसी फेम अभिनेते भुपेश कुमार पांड्या यांचे बुधवारी कॅन्सरने निधन झाले. ते कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये होते. अहमदाबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. दीर्घकाळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी व दोन मुले आहेत.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून भुपेश कुमार पांड्या यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. ‘विख्यात रंगभूमी कलाकार भुपेश कुमार पांड्या ( माजी विद्यार्थी एनएसडी 2001 बॅच ) यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी अतिशय दु:खद आहे. एनएसडी परिवार त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,’ असे ट्विट एनएसडीने केले आहे.
विख्यात रंगकर्मी भूपेश कुमार पांड्या ( पूर्व छात्र एनएसडी 2001 बैच ) के आकस्मिक निधन की खबर बेहद दुखद है एनएसडी परिवार भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता है । ईश्वर दिवंगत आत्मा को शांति प्रदान करे।#NSDfamily @nirupamakotru@MinOfCultureGoIpic.twitter.com/bTbI5TenE0
— National School of Drama (@nsd_india) September 23, 2020
भुपेश यांना फुफ्फुसाच्या कॅन्सरने गाठले होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. सोबत ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते. जवळची सर्व बचत उपचारांवर खर्च झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. कीमोथेरपी आणि इम्युनोथेरपीसाठी 15 लाखांचा खर्च करायचा कसा? असा प्रश्न त्यांच्या पत्नीला पडला होता. अशात बॉलिवूडचे काही कलाकार त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले होते. भुपेश यांच्या मित्राने त्यांच्या उपचारासाठी निधी आवश्यक असल्याची पोस्ट शेअर केली होती. अभिनेता मनोज वाजपेयीने देखील याबाबत ट्वीट शेअर केले होते. यानंतर गजराज राव यांनी 25 हजारांची मदत केली होती. राजस्थान सरकारने अभिनेत्याच्या उपचारासाठी मुख्यमंत्री निधीतून 2 लाख रूपये दिले होते. भुपेश यांच्या एनएसडीच्या बॅचमेट्सनेही त्याना मदत दिली होती. उपचाराचा खर्च भागवण्यासाठी एक क्राऊडफंडिंग पेज बनवण्यात आले होते. मात्र बुधवारी भुपेश यांनी अंतिम श्वास घेतला.
भगवान Bhupesh Pandya की आत्मा को शांति प्रदान करें!!! 🙏🙏 https://t.co/Cr9xc28DJm
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) September 23, 2020
एनएसडीचे माजी विद्यार्थी असणा-या भुपेश पांड्या यांच्या जाण्याने त्यांच्या सहकलाकारांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. अभिनेता मनोज वाजपेयी, गजराज राव यांनी भुपेश यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भुपेश यांनी विकी डोनर, हजारों ख्वाहिशें ऐसी या सिनेमांत काम केले होते.
संजय दत्तनंतर आता या अभिनेत्याला झाला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी आहे पैशांची गरज