'छावा'च्या शूटिंगदरम्यान विकी कौशल-अक्षय खन्ना एकमेकांशी अजिबात बोलायचे नाहीत कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 18:31 IST2025-02-04T18:31:33+5:302025-02-04T18:31:58+5:30
'छावा'च्या शूटिंगवेळेस विकी कौशल-अक्षय खन्ना एकमेकांशी काहीच बोलले नाहीत (chhaava movie, vicky kaushal)

'छावा'च्या शूटिंगदरम्यान विकी कौशल-अक्षय खन्ना एकमेकांशी अजिबात बोलायचे नाहीत कारण...
'छावा' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाविषयीचे अनेक रंजक किस्से समोर येत आहेत. सिनेमाच्या स्टारकास्टबद्दल सांगायचं तर अभिनेता विकी कौशल सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतोय. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. अक्षय खन्ना सिनेमात औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'छावा'च्या सेटवर अक्षय खन्ना आणि विकी कौशल एकमेकांना अजिबात भेटले नाहीत. एकमेकांशी बोलले नाहीत, असा खुलासा दिग्दर्शकाने केलाय. काय म्हणाले लक्ष्मण उतेकर जाणून घ्या.
'छावा' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अक्षय-विकी एकमेकांशी बोलले नाहीत
'छावा' सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला की, "छावा सिनेमाचं अंतिम दृश्य शूट करण्याआधी विकी कौशल-अक्षय खन्ना एकमेकांना कधीही भेटले नव्हते. ज्यादिवशी दोघांचं एकत्र शूटिंग होतं त्याचदिवशी दोघं पहिल्यांदा एकमेकांसमोर आले. आणि ते सुद्धा छ.संभाजी महाराज आणि औरंगजेबाच्या रुपात. 'छावा'च्या शूटिंगदरम्यान इतर वेळेस गुड मॉर्निंग, गुडबाय अशा कोणत्याही गोष्टी त्यांनी केल्या नाहीत."
दिग्दर्शक उतेकर पुढे म्हणाले की, "अक्षयने औरंगजेबाची भूमिका साकारली तर विकी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत होता. त्यामुळे थेट शूटिंगच्या वेळेस ते एकमेकांसमोर पहिल्यांदा आले." विकी याविषयी म्हणाला, "सीनचं गांभीर्य ओळखून आम्ही संपूर्ण शूटिंगच्या वेळेस एकमेकांच्या बाजूलाही बसायचो नाही. मला आशा आहे की, सिनेमा रिलीज झाल्यावर माझा अक्षय खन्ना यांच्याशी संवाद होईल. पण शूटिंगदरम्यान आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही."