'छावा'च्या सेटवरुन विकी घरी आल्यावरही डोक्यात शंभूराजांचेच विचार, कतरिनाला आवडली 'ही' सवय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 14:53 IST2025-02-12T14:53:14+5:302025-02-12T14:53:37+5:30

'छावा'च्या शूटिंगवरुन घरी आल्यावर विकी कौशलमध्ये झालेला हा बदल, पत्नी कतरिना झालेली प्रचंड खूश (chhaava, vicky kaushal, katrina kaif)

vicky kaushal and katrina kaif reaction while vicky return from chhaava movie set | 'छावा'च्या सेटवरुन विकी घरी आल्यावरही डोक्यात शंभूराजांचेच विचार, कतरिनाला आवडली 'ही' सवय

'छावा'च्या सेटवरुन विकी घरी आल्यावरही डोक्यात शंभूराजांचेच विचार, कतरिनाला आवडली 'ही' सवय

'छावा' सिनेमाची (chhaava movie) सध्या सगळ्यांना उत्सुकता आहे. पुढील दोन दिवसांमध्ये 'छावा' सिनेमा जगभरातील थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. विकी कौशलने सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. टीझर, ट्रेलर पाहून विकी कौशलने केवळ छत्रपती संभाजी महाराजांची साकारलीच नाही तर ती जगताना दिसतोय. 'छावा'च्या शुटिंगमधून घरी आल्यावर विकी कौशलची (vicky kaushal) अवस्था काय होती, याचा खुलासा त्याने केलाय. याशिवाय पत्नी कतरिनाची (katrina kaif) काय प्रतिक्रिया असायची, हे सुद्धा विकीने सांगितलंय.

विकी शूटिंगमधून घरी आल्यावर काय करायचा?

विकी कौशलने 'छावा'च्या प्रमोशननिमित्ताने एका मुलाखतीत सांगितलं की, "मी सलग १२ तास शूटिंग करायचो. २ तासांचं ट्रेनिंग आणि २ तास अॅक्शन दृश्यांची रिहर्सल करण्यासाठी जायचे. त्यामुळे घरी जाण्यासाठी फार कष्टाने वेळ मिळायचा. जेव्हा घरी जायचो तेव्हा फक्त झोपावंसं वाटायचं. घरी आल्यावर माझी चालण्यात थोडा बदल झाला होता. त्यावेळी कतरिनाने मी थोडा वेगळ्या पद्धतीने कसा चालतोय, याचं निरीक्षण केलं होतं. त्यावेळी ती फक्त हसली आणि तिला माझ्यातला हा बदल आवडला होता."

"मी कधी कधी एकदम शांत होऊन जायचो. कारण शूटिंगदरम्यान मी फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या कॅरेक्टरमध्ये असायचो. त्यामुळे घरी राहतानाही माझ्या डोक्यात तेच असायचं. मी शूटिंगमध्ये काय केलंय, आणि आणखी काय करु शकतो, हे विचार सतत डोक्यात घोळायचे." असा खुलासा विकीने केलाय. कतरिनाही या इंडस्ट्रीचा हिस्सा असल्याने तिला माझी घालमेल समजत होती, असंही विकी म्हणाला. अशाप्रकारे 'छावा'च्या शूटिंगदरम्यान विकीने आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय. 

 

Web Title: vicky kaushal and katrina kaif reaction while vicky return from chhaava movie set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.