विकी कौशल आणि कतरिना कैफसाठी पत्र घेऊन लग्न मंडपात पोहोचला पोस्टमन, काय आहे पत्रात?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 06:12 PM2021-12-08T18:12:19+5:302021-12-08T18:12:40+5:30

Vicky Kaushal and Katrina Kaif wedding : आज बुधवारी हळदीचा कार्यक्रम आहे आणि उद्या त्यांचं लग्न होणार आहे. लग्नाआधी फोर्टमध्ये एक अजब घटना घडली. पोस्टमन एकक पत्र घेऊन फोर्टमध्ये आला होता.

Vicky Kaushal and Katrina Kaif wedding : actors received a letter through postman | विकी कौशल आणि कतरिना कैफसाठी पत्र घेऊन लग्न मंडपात पोहोचला पोस्टमन, काय आहे पत्रात?

विकी कौशल आणि कतरिना कैफसाठी पत्र घेऊन लग्न मंडपात पोहोचला पोस्टमन, काय आहे पत्रात?

googlenewsNext

राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये सध्या कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) च्या लग्नाची चर्चा जोरात रंगली आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील हॉटेल सिक्स सेंस फोर्टच्या बरवाडामध्ये हे शाही लग्न मोठ्या थाटात पार पडत आहे. अशातच फोर्टमध्ये विकी कौशलच्या नावाने एक पत्र घेऊन पोस्टमन आला होता.

आज बुधवारी हळदीचा कार्यक्रम आहे आणि उद्या त्यांचं लग्न होणार आहे. लग्नाआधी फोर्टमध्ये एक अजब घटना घडली. पोस्टमन एकक पत्र घेऊन फोर्टमध्ये आला होता. ज्यावर कतरिना कैफ विकी कौशल यांची नावे लिहिली होती. अशात त्याला हे पत्र कतरिना कैफ आणि विकी कौशलला द्यायचं होतं. पण त्याला सिक्युरिटीने आत प्रवेश दिला नाही. सिक्युरिटी इ्न्चार्जनेच ते पत्र रिसीव केलं.

कतरिनाला पत्र दिलं जाईल सांगत पोस्टमनला परत पाठवण्यात आलं. हे पत्र श्री राधा गोविंद पशु चिकित्सालयाचे कोषाध्यक्ष विष्णु प्रसाद सिंघन यांनी पाठवलं होतं. पत्रात कतरिना आणि विकी कौशलसाठी लिहिण्यात आलं होतं की, सप्तपदी झाल्यावर सवाई माधोपूरमधील गौशाळेत या आणि आधुनिक पशु चिकित्सालयाच्या निर्माणात सहकार्य करावे. सोबतच बैलांपासून वीज निर्मिती करण्यासाठी संयंत्र लावण्यासाठी त्यांना आग्रह करण्यात आला.

या पत्रात सांगण्यात आलं की गौशाळके २३ एकर जमीन आहे. अशात सप्तपदी झाल्यावर कतरिना कैफ आणि विकी कौशल याला गौशाळेत येण्याचा आग्रह करण्यात आला आहे. तसेच गायींची पूजा कऱण्यास सांगितलं. आता लग्नानंतर ते दोघे काय करतात हे बघणं महत्वाचं ठरेल.
 

Web Title: Vicky Kaushal and Katrina Kaif wedding : actors received a letter through postman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.