विकी कौशल व कतरिना कैफच्या लग्नाचं रिसेप्शन कार्ड व्हायरल, जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 18:05 IST2021-12-12T18:05:31+5:302021-12-12T18:05:54+5:30
vicky kaushal and katrina kaif wedding reception : लग्नानंतर आता विकी व कॅटच्या रिसेप्शनचे फोटोही पाहायला मिळणार, म्हणून चाहते आनंदात आहेत. तुम्हीही याच आनंदात असाल तर जरा थांबा. कारण...

विकी कौशल व कतरिना कैफच्या लग्नाचं रिसेप्शन कार्ड व्हायरल, जाणून घ्या सत्य
विकी कौशल व कतरिना कैफ यांच्या लग्नाचे फोटो पाहून चाहते चांगलेच क्रेझी झाले आहेत. विकी व कतरिना गेल्या 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर काही तासांतच जोडप्याने लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले होते. यानंतर काल या स्टार जोडप्याने हळदीचे फोटो शेअर केलेत आणि आज मेहंदी व संगीत सेरेमनीचे फोटो पोस्ट केलेत. सध्या हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंसोबत सोशल मीडियावर विकी व कॅटच्या रिसेप्शन कार्डचा फोटोही व्हायरल झाला आहे. लग्नानंतर आता विकी व कॅटच्या रिसेप्शनचे फोटोही पाहायला मिळणार, म्हणून चाहते आनंदात आहेत. तुम्हीही याच आनंदात असाल तर जरा थांबा. कारण विकी व कॅटने असं कुठलेही निमंत्रण पाठवलेलं नाही.
होय, व्हायरल झालेला हा फोटो विकी व कॅटच्या रिसेप्शन कार्डचा नाही, तर रिटर्न गिफ्टचा आहे. लग्नात सहभागी न झालेल्यांना विकी व कॅटने रिटर्न गिफ्ट पाठवलं आहे. हा त्याच रिटर्न गिफ्टचा फोटो आहे. आता अनेक स्टार्स याच रिटर्न गिफ्टचा फोटो शेअर करत आहेत. कंगना राणौत हिलाही हे रिटर्न गिफ्ट मिळालं आहे. अभिनेता रोनित रॉय यालाही विकी व कॅटने हे खास रिटर्न गिफ्ट पाठवलं आहे.
तूर्तास तरी विकी व कॅटच्या रिसेप्शनची काहीही चर्चा नाही. लग्नानंतर स्टार कपल हनीमूनसाठी मालदीवला रवाना झाल्याचीही चर्चा आहे. राजस्थानमधील माधोपूर येथील एका आलिशान राजवाड्यात विकी -कतरिनाचा विवाह सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात मेहंदीपासून ते हळदीपर्यंत प्रत्येक कार्यक्रमाचं जंगी आयोजन करण्यात आलं होतं. सध्या या लग्नसोहळ्यातील फोटो समोर येत असून सगळीकडे कतरिनाच्या मेहंदीची चर्चा रंगली आहे. कतरिनाने केवळ मेहंदी सोहळ्यासाठी जवळपास ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत खर्च केल्याचं सांगण्यात येत आहे.