विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नातील पाहुण्यांची यादी झाली लीक, या सेलिब्रेटींची नावं आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 16:56 IST2021-11-13T16:55:48+5:302021-11-13T16:56:29+5:30
अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत.

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नातील पाहुण्यांची यादी झाली लीक, या सेलिब्रेटींची नावं आली समोर
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. त्यांच्या या ग्रॅण्ड व्हेडिंगमध्ये सहभागी होणाऱ्या पाहुण्यांची यादी समोर आली आहे. असे वृत्त आहे की बॉलिवूडच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ७ ते ९ डिसेंबरपर्यंत स्वतःला फ्री ठेवण्याची विनंती केली आहे. करण जोहर, अली अब्बास जफर, कबीर खान, मिनी माथुर, रोहित शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, वरूण धवन आणि नताशा दलाल यासारख्या कलाकारांचा समावेश असणार आहे.
इंडिया टुडेच्या रिपोर्ट्सनुसार, कतरिना आणि विकीचे ७ ते १२ डिसेंबरपर्यंत लग्न चालणार आहे. लग्नासाठी हॉटेलची बुकिंगदेखील झाली आहे. पण फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. या व्हीआयपी व्हेडिंगचे आयोजनासाठी कित्येक इव्हेंट कंपनी मिळून काम करणार आहे. वेगवेगळ्या इव्हेंटसाठी वेगवेगळ्या कंपनीना ठेवले जात असल्याच्या वृत्ताला न्यूज एजेंसी आईएएनएसने दुजोरा दिला आहे.
इव्हेंट कंपनी करताहेत हॉटेल्सच्या रुमची रेकी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कंपनीचे प्रतिनिधी सवाई माधोपुरच्या वेगवेगळ्या हॉटेल्सच्या रुमची रेकी करत आहेत. या टीमने पाहुण्यांना एअरपोर्टहून हॉटेलमध्ये आणण्यासाठी कार भाड्याने घ्यायला सुरूवात केली आहे. असे सांगितले जात आहे की, शहरात कारची कमतरता असल्यामुळे दुसऱ्या शहरांतून मागवण्यात आल्या आहेत.
विकी कौशलने सांगितले त्याच्या 'दुल्हनिया'बद्दल
विकी कौशल नुकताच बियर ग्रिल्ससोबत भीती आणि कित्येक अडचणींचा सामना करण्यासाठी 'इन टू द वाइल्ड' शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी विकीने शोमध्ये त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. विकीने शोमध्ये त्याच्या स्ट्रगलिंग दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. पण, या शोमध्ये विकी कौशलने त्याला भावी पत्नी कशी हवी, याबद्दल सांगितले.