'छावा' ट्रेलरमधील 'तो' डायलॉग नेटकऱ्यांना खटकला, सोशल मीडियावर काय चर्चा रंगली आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:19 IST2025-01-24T18:10:14+5:302025-01-24T18:19:24+5:30

छावा' ट्रेलरमधील एक डायलॉग नेटकऱ्यांना खटकला आहे.

Vicky Kaushal And Rashmika Mandanna Chhaava Trailer Create Controversy Over Dialogue Social Media Reaction | 'छावा' ट्रेलरमधील 'तो' डायलॉग नेटकऱ्यांना खटकला, सोशल मीडियावर काय चर्चा रंगली आहे?

'छावा' ट्रेलरमधील 'तो' डायलॉग नेटकऱ्यांना खटकला, सोशल मीडियावर काय चर्चा रंगली आहे?

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'छावा'  (Chhaava Trailer) सिनेमाचा ट्रेलर २२ जानेवारीला रिलीज झाला आहे. या ट्रेलरची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा रंगली असून नवा वाद निर्माण झाला आहे. ट्रेलरमधील काही दृश्यांवर शिवप्रेमींकडून आक्षेप घेण्यात आला आहे. 'छावा' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई हे  लेझीम खेळताना आणि नृत्य करत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. यावरुन सिनेमाला विरोध होत आहे. तर यासोबतच ट्रेलरमधील एक डायलॉग अनेकांना पटला नाहीये. यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

'छावा' या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत असलेला विकी कौशल "हे राज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा" असं म्हणतो. पण, हा  डॉयलॉग नेटकऱ्यांना खटकला आहे.  यावर सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेटकऱ्यांच्या मते सिनेमात "हे राज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा" असं नव्हे तर "हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा !" असं हवं होतं. या एका डायलॉगमुळे अनेक चाहत्यांची निराशा झाली आहे. 

दरम्यान, दुसरीकडे अनेकांनी ट्रेलरची भरभरुन कौतुक केलं आहे.  विकी कौशल, रश्मिकाच्या अभिनयाचीही वाहवा होत आहे. ट्रेलर पाहूनच हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा बॉलिवूड हिट ठरू शकतो, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.  व्हीएफएक्सला चाहत्यांनी भरभरून दाद दिली आहे. ट्रेलरमधील पैलूंवर कौतुकाचा वर्षाव होतोय. 'छावा' सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. संतोष जुवेकर, सुव्रत जोशी या मराठी कलाकारांचीही सिनेमात वर्णी लागली आहे. लक्ष्मण उत्तेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
 

Web Title: Vicky Kaushal And Rashmika Mandanna Chhaava Trailer Create Controversy Over Dialogue Social Media Reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.