'लालबागचा राजा' दर्शनासाठी गेलेला विकी कौशल चाहत्यांच्या गर्दीत अडकला अन्...; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 13:30 IST2023-09-21T13:29:36+5:302023-09-21T13:30:27+5:30
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलही लालबागचा राजाच्या दर्शनाला गेला होता. त्यादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

'लालबागचा राजा' दर्शनासाठी गेलेला विकी कौशल चाहत्यांच्या गर्दीत अडकला अन्...; व्हिडिओ व्हायरल
राज्यात सगळीकडेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षीही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला पाहायला मिळत आहे. दरवर्षी बॉलिवूड सेलिब्रिटीही जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतात. अनेक सेलिब्रिटी मुंबई आणि पुण्यातील प्रसिद्ध गणपतींच्या दर्शनाला जातात. मुंबईतील लालबागचा राजा गणपतीच्या चरणीही अनेक सेलिब्रिटी नतमस्तक होतात. यंदाही कार्तिक आर्यन, वरुण धवन या बॉलिवूड सेलिब्रिटींनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले. बॉलिवूड अभिनेता विकी कौशलही लालबागचा राजाच्या दर्शनाला गेला होता. त्यादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
विकी कौशलने बुधवारी(२० सप्टेंबर) लालबागचा राजाचे दर्शन घेतले. पण, विकी कौशल लालबागचा राजाच्या दर्शनाला गेला असता गणपती बाप्पाच्या आवारात त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. वुम्पला या पापाराझी पेजवरुन विकी कौशलचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत चाहत्यांनी विकी कौशलच्या भोवती गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. चाहत्यांच्या गर्दीतून विकी कौशलला पोलीस सुरक्षित घेऊन जातानाही दिसत आहेत.
दरम्यान, विकी कौशल 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट २२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विकीबरोबर मानुषी छिल्लर, यशपाल शर्मा, मनोज पाहवा, सृष्टी दीक्षित हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.