Vicky Kaushal Birthday Special: विकीचे आई-वडील राहायचे दहा बाय दहाच्या खोलीत, वाचा त्याचा स्ट्रगल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 12:35 PM2019-05-16T12:35:18+5:302019-05-16T12:35:58+5:30

विकीचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर असले तरी विकीने त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.

Vicky Kaushal Birthday Special: Vicky Kaushal Opens Up About His Struggle As an Actor | Vicky Kaushal Birthday Special: विकीचे आई-वडील राहायचे दहा बाय दहाच्या खोलीत, वाचा त्याचा स्ट्रगल

Vicky Kaushal Birthday Special: विकीचे आई-वडील राहायचे दहा बाय दहाच्या खोलीत, वाचा त्याचा स्ट्रगल

googlenewsNext
ठळक मुद्देहार पत्करायची नाही असे मी ठरवले होते. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता घरातून निघालो आणि दिवसभर ऑडिशन्स दिली. त्या दिवसापासून ऑडिशन्स देणे माझे नित्यनियमाचे झाले होते.

विकी कौशलचा आज (१६ मे) वाढदिवस असून त्याचा जन्म मुंबईत १९८८ ला झाला. उरीः द सर्जिकल स्ट्राईक, संजू या चित्रपटामुळे आज विकीने बॉलिवूडमध्ये आज आपले प्रस्थ निर्माण केले आहे. पण विकीसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर असले तरी विकीने त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.

बॉलिवूडमध्ये काम मिळवणे सोपे नसते असे विकीचे म्हणणे आहे. विकीने कॉस्मोपॉलिटनला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितले होते. विकीने अभिनयक्षेत्रात येण्याआधी एका आयटी कंपनीत मुलाखत दिली होती आणि त्याला तिथे नोकरी देखील मिळाली होती. पण आपल्याला अभिनयक्षेत्रातच करियर करायचे असे त्याने पक्के ठरवले असल्याने त्याने ऑफर लेटर फाडून दिले होते. याविषयी विकीने मुलाखतीत सांगितले होते की, मी कॉलेजमध्ये असताना आयटी कंपनीत नोकरी करण्याचे ठरवले होते. नोकरी केवळ मजेखातर करायची असे माझे पक्के ठरले होते. मुलाखतीला जाताना लोकांच्या चेहऱ्यावर जो नर्व्हसनेस असतो, तो मला अनुभवायचा होता. मुलाखतीत मी पास झाल्यानंतर मला ऑफर लेटर देखील देण्यात आले होते. पण मी अभिनयाशिवाय दुसरे काहीही करू शकत नाही याची मला चांगलीच जाणीव होती. त्यामुळे मी ऑफर लेटर फाडून टाकले आणि ऑडिशन द्यायला सुरुवात केली. माझे पहिले ऑडिशन हे खूपच भयंकर होते. घरी परतत असताना एकच विचार माझ्या डोक्यात सुरू होता, विकी तू नोकरीचे ऑफर लेटर तर फाडले आहेस... आता काय होणार?

मी प्रचंड घाबरलो होतो. पण हार पत्करायची नाही असे मी ठरवले होते. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता घरातून निघालो आणि दिवसभर ऑडिशन्स दिली. त्या दिवसापासून ऑडिशन्स देणे माझे नित्यनियमाचे झाले होते. तसेच अभिनय कशाप्रकारे केला जातो हे शिकण्यासाठी मी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. मसान २०१५ मध्ये प्रदर्शित झाला आणि मला ओळख मिळाली. माझ्या वडिलांना या चित्रपटातील माझा परफॉर्मन्स प्रचंड आवडला होता. 

माझ्या वडिलांनी देखील स्ट्रगल करूनच प्रत्येक गोष्ट मिळवली आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली, त्यावेळी ते दहा बाय दहाच्या घरात राहायचे. त्यावेळी घरात फक्त एक चटई आणि खुर्ची होती. त्यांनी प्रचंड मेहनत करून घरातील प्रत्येक गोष्ट विकत घेतली. त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीची आम्हाला किंमत असली पाहिजे असे त्यांचे म्हणणे असते. मला मिळालेल्या यशामुळे माझे आई-वडील प्रचंड खूश आहेत. मी माझ्या पैशाने ज्यावेळी पहिली गाडी घेतली, त्यावेळी माझ्या आईला झालेला आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. 

Web Title: Vicky Kaushal Birthday Special: Vicky Kaushal Opens Up About His Struggle As an Actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.