विकी कौशलच्या 'छावा'मध्ये झळकणार हा मराठमोळा अभिनेता, पोस्ट लिहून म्हणतो, "मला अभिमान आहे की..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 01:26 PM2024-08-19T13:26:14+5:302024-08-19T13:28:32+5:30

विकी कौशलच्या 'छावा' सिनेमात मराठमोळा अभिनेता झळकणार आहे. या अभिनेत्याने पोस्टच्या माध्यमातून आनंद व्यक्त केलाय (vicky kaushal, santosh juvekar)

Vicky Kaushal Chhaava teaser out marathi actor santosh juvekar will be seen in movie | विकी कौशलच्या 'छावा'मध्ये झळकणार हा मराठमोळा अभिनेता, पोस्ट लिहून म्हणतो, "मला अभिमान आहे की..."

विकी कौशलच्या 'छावा'मध्ये झळकणार हा मराठमोळा अभिनेता, पोस्ट लिहून म्हणतो, "मला अभिमान आहे की..."

विकी कौशलचा 'छावा' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. विकी कौशलच्या जबरदस्त अभिनयाने सजलेला 'छावा'च्या टीझरने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. अल्पावधीत या टीझरने मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. 'छावा' सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या सिनेमाची एक खास गोष्ट म्हणजे सिनेमात मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता झळकणार आहे. हा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर.

संतोष जुवेकरने पोस्ट करत केला खुलासा

संतोष जुवेकरने त्याच्या इन्स्टाग्रामवर 'छावा'चा टीझर शेअर करुन लिहिलंय की, "आपला "छावा" आपल्या सोबत कायम आहे. आणि मला कम्माल अभिमान आहे की मी ह्या सिनेमाचा भाग आहे. ते आले तेच स्वप्नं घेऊन. ते आले तेच शौर्य घेऊन. ते आले तोच बाणा घेऊन. ते आले छत्रपतींच्या श्वासातले कोटी कोटी बळ घेऊन.  ते आले तीच धमन्यात धगधगती हिंदवी स्वराज्याची ज्वाला घेऊन. माझ्या राजाचा शिवशाही लढवय्या घेऊन. ते आले तोच हिंदवी स्वराज्याचा ध्यास घेऊन.  माझ्या राजन एक खरा लढवय्या.. खरा वारस माझ्या हिंदू राष्ट्राला बहाल केला... त्या माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मुजरा.. जय भवानी.. जय शिवराय.."



'छावा'च्या टीझरची चर्चा

 'छावा'च्या टीझरने अल्पावधीत प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय. हा टीझर अंगावर काटा आणणारा आहे यात शंका नाही. या टीझरमध्ये सुरुवातीला बघायला मिळतं की, गनिमांचा किल्ल्याला वेढा पडलेला आहे. पुढे चिलखत परिधान करुन घोड्यावर स्वार होत संभाजी महाराज शत्रूंचा सामना करण्यासाठी सज्ज असतात. 'छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है और हम छावा', असा जबरदस्त डायलॉग सिनेमात दिसतो. संभाजी महाराज आक्रमकपणे गनिमांशी लढताना दिसतात. शेवटी छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणत सिंहासनावर विराजमान असलेले शंभूराजे बघायला मिळतात. ६ डिसेंबरला 'छावा' हा सिनेमा रिलीज होणार आहे.

 

Web Title: Vicky Kaushal Chhaava teaser out marathi actor santosh juvekar will be seen in movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.