स्वॅग है भाई! पंजाबी गाण्यावर विकी कौशलचा हटके डान्स, चाहत्यांना लावलं वेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 17:36 IST2023-09-12T17:35:54+5:302023-09-12T17:36:24+5:30
विकी कौशलने पंजाबी गाण्यावर भन्नाट डान्स करून सर्वांची मन जिंकली आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोयं.

Vicky Kaushal
बॉलिवूडचा हँडसम अभिनेता विकी कौशल आगामी 'द ग्रेट इंडियन फॅमिली' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सध्या तो या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तरुणींच्या गळ्यातला ताईत असलेल्या विकी कौशलने पंजाबी गाण्यावर भन्नाट डान्स करून सर्वांची मन जिंकली आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोयं.
पंजाबी गायक करण औजलाच्या 'चुनी रंग दे ललारिया' या गाण्यावर विकी कौशल डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना विकीने लिहिले की, 'मला फक्त या स्टाइलमध्ये फोटोशूट कसे करायचे हे माहिती आहे. तर विकीचे डान्स मूव्ह पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वीही त्याने 'जरा हटके जरा बचके के' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान 'ऑब्सेस्ड' या पंजाबी गाण्यावर डान्स केला होता. विकीचा डान्स चाहत्यांना खूप आवडला होता.
'द ग्रेट इंडियन फॅमिली' सिनेमा २२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यामध्ये मानुषी छिल्लर विकी कौशलसोबत झळकणार आहे. विजय कृष्ण आचार्य यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर विकीच्या या आगामी सिनेमाकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.