"आता मला काय माहित याचा अर्थ ड्रग्स घेणे असा होतो", विकी कौशलचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 05:22 PM2020-09-26T17:22:21+5:302020-09-26T17:23:00+5:30
27 जुलैला झालेल्या या पार्टीत एनसीबीला कोकेना घेतल्याचा संशय आहे. करण जोहरच्या या पार्टीत दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, विकी कौशल सारख्या अनेक कलाकार सामील होते. या पार्टीचा व्हिडीओ करण जोहरने 28 जुलैला 2019ला शेअर केला होता.
करण जोहरच्या घरी 27 जुलै 2019 ला झालेली पार्टी एनसीबीच्या निशाण्यावर आहे. एनसीबीला संशय आहे या पार्टीत ड्रग्सचा वापर झाला आहे. या पार्टीत कोकेन घेतल्याचा संशय एनसीबीला आहे. या पार्टीत उपस्थित लोकसुद्धा NCBच्या रडावर येऊ शकतात.पार्टीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी होताना दिसतायेत, ज्यामुळे या पार्टीत ड्रग्सचा वापर झाल्याचा संशय बळावला आहे. 27 जुलैला झालेल्या या पार्टीत एनसीबीला कोकेना घेतल्याचा संशय आहे. करण जोहरच्या या पार्टीत दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, विकी कौशल सारख्या अनेक कलाकार सामील होते. या पार्टीचा व्हिडीओ करण जोहरने 28 जुलैला 2019ला शेअर केला होता.
Listen in to what #VickyKaushal and #KaranJohar had to say about the latter’s 2019 party, which is now on #NCB radar.#5iveLive with @ShivAroorpic.twitter.com/fgYMdJNuMt
— IndiaToday (@IndiaToday) September 25, 2020
त्यावेळी देखील हे कलाकार पार्टीत ड्रग्स घेत असल्याचे वेगाने पसरले होते. दरम्यान इंडिया टु़डे कॉनक्लेव्हमध्ये विकी कौशलने याबाबत स्पष्टीकरण दिले होते. नाकावर खाज येत होती, नाकावर खाजवणे खूप नॉर्मल आहे, मला नव्हते माहित याचा अर्थ ड्रग्ज घेणे असा होतो. त्याचा हा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. तसेच करण जोहरचा सपोर्टमध्ये विकीने सांगितले की, पार्टीत सगळेच कलाकार ड्रग्स घेतल आहेत. यावर पडदा टाकण्या ऐवजी त्याचाच व्हिडीओ करण कसा काय बनवेल या गोष्टीचाही विचार करणे गरजेचे आहे.
एनसीबीच्या चौकशीदरम्यान क्षितिजने धर्मा प्रॉडक्शनसोबत काम केलेला त्याचा मित्र आणि असिस्टंट डिरेक्टर अनुभव चोप्राचं नाव घेतलं. त्यानंतर अनुभव चोप्राचीही चौकशी करण्यात आली. आता एनसीबीने क्षितिज चोप्राला ताब्यात घेतलं असून अनुभव चोप्राला घरी जाऊ दिलं. दोघांनाही करण जोहरच्या पार्टीबाबत विचारण्यात आलं.
— Karan Johar (@karanjohar) September 25, 2020
क्षितिज प्रसादला ताब्यात घेतल्यानंतर करण जोहरने सोशल मीडियावर प्रेस नोट जारी करून स्पष्टीकरण दिलं. त्याने लिहिलं की, 'काही न्यूज चॅनल्स, प्रिंट/इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चुकीची माहिती प्रकाशित करत आहेत की, मी माझ्या घरी २८ जुलै २०१९ ला आयोजित केलेल्या पार्टीत ड्रग्सचं सेवन केलं गेलं. मी आधीही सांगितलं आहे की, हे सगळे आरोप चुकीचे आहेत. मी पुन्हा सांगतो की, हे आरोप निराधार आणि खोटे आहेत. पार्टीत कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांच सेवन केलं गेलं नव्हतं. मी ना नशेच्या पदार्थांच सेवन करत नाही, तसेच त्यांना प्रमोटही करत नाही.'